Pune : टाटा मोटर्सच्या पुणे प्लांटला रीन्युएबल एनर्जी इंडिया पुरस्कार 2018 मध्ये मानाचा ‘रीन्युएबल एक्सलन्स एंड युझर’ पुरस्कार

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स या भारतातील एका आघाडीच्या ऑटोमोबाइल कंपनीने त्यांच्या पुणे प्लांटला रीन्युएबल एनर्जी इंडिया पुरस्कार 2018 मध्ये मानाचा ‘रीन्युएबल एक्सलन्स एंड युझर’ पुरस्कार मिळाल्याची घोषणा आज केली. यूबीएम इंडियातर्फे आयोजित हे आशियातील सर्वात मोठे रीन्युएबल एनर्जी एक्स्पो होते.

टाटा मोटर्स पुणे प्लांटचे ‘आरई एक्सलन्स एंड यूझर’ विभागात परीक्षण करण्यात आले. यात ‘आरई 100 उपक्रमा’तील कंपनीची बांधिलकी आणि पर्यावरण बदलातील परिणाम कमी करण्यातील त्यांच्या कामाला वाखाणण्यात आले. टाटा मोटर्सच्या पुणे प्लांटमध्ये एकूण वार्षिक ऊर्जा मागणीतील 51 टक्के मागणी नूतनीकरणीय ऊर्जेतून पूर्ण केली जाते. यात पवनऊर्जा आणि रूफटॉप सोलार ऊर्जेचा वापर केला जातो.

टीएस, सीव्हीबीयू पुण्याचे प्रमुख नितिन टिळक आणि सीएमएस, सीव्हीबीयू पुण्याचे प्रमुख विवेक जोशी यांच्या हस्ते प्लांटमधील सुयोग्य पद्धतींसाठीचे पुरस्कार देण्यात आले. सीपीईडी इलेक्ट्रिकलचे प्रमुख सुधीर भाले यांनी सप्टेंबर 2018 मध्ये ग्रेटर नॉयडामध्ये झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार स्वीकारला. निर्धारकांनी पुणे प्लांटमधील उत्साही टीमचे अभिनंदन केले आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा प्रसार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना वाखाणले.

याप्रसंगी टाटा मोटर्सचे सीओओ आणि ईडी सतिश बोरवणकर म्हणाले, “ऑटोमोबाइलचे सातत्याने विस्तारणारे क्षेत्र लक्षात घेता एकूण परीसंस्थेच्या शाश्वत विकासाचा एकात्मिक दृष्टिकोन बाळगणे महत्त्वाचे आहे. टाटा मोटर्स या क्षेत्रात तांत्रिक बदलांसाठी नवे मार्ग आखत आहे आणि त्याचवेळी व्यवसायाच्या सर्व क्षेत्रात शाश्वत पद्धती बिंबवण्यासाठी कठोर प्रयत्नही करत आहे. प्लांटमधील आमच्या कामाला नावाजल्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि यापुढेही आमचे कर्मचारी व आमचा समाज यांच्‍या शाश्वत भविष्याच्या उभारणीसाठी आम्ही प्रयत्न करू.”

नुतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात नाविन्यता आणून उत्कृष्टतेच्या संकल्पनांना खतपाणी घालणा-या विविध विभागातील वैचारिक नेत्यांनी अवलंबिलेल्या पद्धतींना आरईआय पुरस्कारांमध्ये नावाजले जाते. यंदा उत्कृष्टतेच्या 17 विविध विभागांमध्ये एकूण 50 भारतीय कंपन्यांनी आरईआय पुरस्कार 2018 मध्ये भाग घेतला. मान्यवर परीक्षकांमध्ये न्यू अॅण्ड रिन्युएबल एनर्जी (एमएनआरई), इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (आयआरईडीए), सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी (सीईए), ओएनजीसी एनर्जी सेंटर, इंडो जर्मन एनर्जी फोरम (आयजीईएफ) आणि युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी)च्या प्रतिनिधींचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.