Tata Motor’s : टाटा मोटर्सच्या Q2FY23 गाड्यांच्या विक्रीत 42 टक्क्यांनी वाढ

एमपीसी न्यूज : टाटा मोटर्सने Q2FY23 या गाड्यांचे एकूण 2 लाख 43 हजार 387 युनीट विक्री केलेली आहे. त्यामुळे Q2FY23 च्या विक्रीतील ही 42 टक्क्यांची वाढ आहे.(Tata Motor’s) टाटा मोटर्सच्या Q2FY22 या  केवळ 1 लाख 71 हजार 270 ची विक्री झाली होती. मात्र Q2FY23  या युनीटची विक्री ही मात्र सुमारे अडीच लाखांच्या घरात गेली आहे. केवळ देशांतर्गतच विचार करायचा झाला तर 2 लाख 36 हजार युनीटची विक्रमी विक्री करण्यात आली आहे.

टाटा मोटर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले की, व्यावसायिक वाहन उद्योगात सातत्यपूर्ण कामगिरी दिसून आली.(Tata Motor’s) Q2FY23 मध्ये मागणी वाढली असून व्यवसायाने Q2FY22 मध्ये देशांतर्गत विक्रीत 20% वाढ नोंदवली गेली आहे.  तिमाही चा विचार करायचा झाला तर  93 हजार 675 युनिट्स ही वाढ MHCV ची मजबूत विक्री आणि प्रवासी वाहकांमध्ये मोठ्या मागणीमुळे झाली आहे.

यामध्ये ताफ्याचा वापर सुधारणे, रस्ते बांधणी प्रकल्पांना गती देणे आणि सिमेंटचा वापर वाढणे यामुळे MHCV साठी पुनर्प्राप्तीची मागणी. श्रीलंका आणि नेपाळमधील सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे CV निर्यात मात्र 22% ने घटली असली तरी ती आता 30% नी सुधारली आहे.यात MHCV आणि ILCV मधील स्मार्ट ट्रकच्या नवीन श्रेणीच्या लॉन्च मुळे आम्हाला आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यात मदत होईल.(Tata Motor’s) पुढे जात असताना, सणासुदीत आम्हाला भरगोस विक्रीची अपेक्षा आहे.हंगामात आम्ही विकसित होत असलेल्या भौगोलिक राजकीय, महागाई आणि पुरवठा आणि व्याजदराच्या जोखमींवर बारीक लक्ष ठेवून आहोत, असेही वाघ म्हणाले.

PCMC News : सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या होणार जनसंवाद सभा

 

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले की, पीव्ही उद्योगाला सणासुदीच्या हंगामामुळे आणि नवीन लाँचमुळे वाढलेल्या Q2FY23 मध्ये जोरदार मागणी दिसून आली. टाटा मोटर्सने या तिमाहीत 1 लाख 42 हजार 325 युनिट्स च्या  विक्रीसह प्रवासी वाहनांमध्ये नवीन उच्चांक गाठत Q2FY22 च्या 70% विरुद्ध वाढ नोंदवली आहे.(Tata Motor’s) कंपनीने सप्टेंबर 2022 मध्ये 47हजार 654 ची आतापर्यंतची सर्वोच्च मासिक विक्री देखील गाठली आहे.ही वाढ  सप्टेंबर 2021 च्या तुलनेत 85% एवढी जास्त आहे.

एलईडी नेक्सॉन आणि पंचच्या विक्रमी विक्रीद्वारे, SUV विक्रीने त्रैमासिक पीव्ही विक्रीत 66% योगदान दिले. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये,कंपनीने पुन्हा एकदा Q2FY23 मध्ये 11 हजार 522 युनिट्सची विक्रमी विक्री केली आहे जी  Q2 च्या तुलनेत 326% ची विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. तसेच FY22. Tiago EV च्या अलीकडेच लाँच झाल्यामुळे, कंपनीने नवीन पावले टाकली असून अनेक संकल्पना आत्मसात करण्यासाठी कंपनी तयार आहे. आम्हाला आशा आहे की देशभरात सणासुदीच्या हंगामात ई.व्ही. च्या विक्रीमध्यो मोठी वाढ होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.