Tata Motors Business News : जानेवारीत टाटाच्या 57,742 वाहनांची विक्री, गेल्या वर्षीच्या तुलनेत 28 टक्के वाढ

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जानेवारी 2021 मध्ये टाटाच्या 57 हजार 742 वाहनांची देशात विक्री झाली आहे. मागच्या वर्षी जानेवारीत 45 हजार 242 वाहन विक्री झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाहन विक्रीत 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टाटा मोटर्सच्या वतीने जानेवारी महिन्यातील देशात झालेल्या वाहन विक्रीची माहिती देणारं प्रसिद्धी पत्रक जाहिर केलं आहे. या पत्रकानुसार, जानेवारी 2021 मध्ये 57 हजार 742 वाहनांची विक्री झाली आहे. डिसेंबर 2020 मध्ये 53 हजार 430 तर, जानेवारी 2020 मध्ये 45 हजार 242 वाहनांची विक्री झाली होती. महिन्यांच्या तुलनेत ही वाढ 8 टक्के आहे तर, वर्षाच्या तुलनेत ही वाढ 28 टक्के असल्याचे या पत्रकात म्हंटले आहे.

याच महिन्यात 26 हजार 978 पॅसेंजर व्हेईकलची विक्री झाली असून गेल्या वर्षी जानेवारीत 13 हजार 894 पॅसेंजर व्हेईकलची विक्री झाली होती. देशात आणि आंतराष्ट्रीय बाजारातील मिळून 59 हजार 959 वाहनांची जानेवारी 2021 मध्ये विक्री झाल्याचे या पत्रकात म्हंटले आहे. कोरोनाच्या संकटानंतर टाटा मोटर्सच्या वाहन खेरीदाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.