Tata Motors News : टाटा कार आणि एसयूव्हीच्या किंमतीत वाढ, येत्या काही दिवसांत अधिकृत घोषणा

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सने आपल्या कार आणि एसयूव्ही ‘न्यू फॉरेव्हर’ श्रेणीतील गाड्यांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे ‘टाटा मोटर्स’ने जारी केलेल्या मिडिया स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

‘टाटा’ने दिलेल्या माहितीनुसार, स्टील आणि मौल्यवान धातू तसेच वाहन निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किंमतीत सतत वाढ झाल्यामुळे कंपनीने कार आणि एसयूव्ही ‘न्यू फॉरेव्हर’ श्रेणीतील गाड्यांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या काही दिवसांत वाढीव किंमतीबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे मिडिया स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.