Tata Motors News : टाटा मोटर्सकडून गुजरात सरकारला 25 रूग्‍णवाहिका सुपूर्द

गुजरात सरकारकडून टाटा मोटर्सला एकूण 115 रूग्‍णवाहिकांची ऑर्डर

0

एमपीसी न्यूज – गुजरात सरकारकडून टाटा मोटर्सला 115 रूग्‍णवाहिकांची ऑर्डर मिळाली आहे. त्यापैकी 25 रूग्‍णवाहिका टाटा मोटर्सकडून सरकारला सुपूर्द करण्यात आल्या आहेत. रुग्णवाहीका हस्तांतरणचा कार्यक्रम नुकताच गुजरातमधील गांधीनगर येथे पार पडला.

यावेळी गुजरातचे उपमुख्‍यमंत्री नितीन पटेल, गुजरातचे आरोग्‍य मंत्री किशोर कनानी, आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण विभागाच्‍या मुख्‍य सचिव आयएएस डॉ. जयंती एस. रवी, आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण विभागाचे आयुक्‍त आयएएस जय प्रकाश शिवहरे, जीव्‍हीके ईएमआरआय गुजरातचे सीओओ जसवंत प्रजापती आणि गुजरात सरकारमधील इतर मान्‍यवरांनी उपस्थिती लावली होती.

गुजरात सरकारला सूपूर्द केलेल्या 25 टाटा विंगर रूग्‍णवाहिकांमध्‍ये मुलभूत जीवन सहाय्यक सुविधांचा समावेश आहे. शहरामध्‍ये रूग्‍णांच्‍या मदतीसाठी या रूग्‍णवाहिका तैनात करण्‍यात येतील.

टाटा मोटर्सने गव्‍हर्नमेंट ई-मार्केटप्‍लेस अंतर्गत ऑर्डरसाठी लावण्‍यात आलेली बोली जिंकली. रूग्‍णवाहिका एआयएस 125 पार्ट 1 नुसार रूग्‍णांच्‍या परिवहनासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत. टाटा मोटर्स करारानुसार टप्‍प्‍याटप्‍प्‍याने उर्वरित 90 रूग्‍णवाहिकांचा पुरवठा करणार आहे.

याप्रसंगी बोलताना टाटा मोटर्सच्‍या एससीव्‍हीमधील प्रॉडक्‍ट लाइनचे उपाध्‍यक्ष विनय पाठक म्‍हणाले, टाटा विंगर रूग्‍णवाहिका रूग्‍ण व आरोग्‍यसेवा यंत्रणेच्‍या गरजा लक्षात घेत डिझाइन करण्‍यात आली आहे. विंगर रूग्‍णवाहिका आरोग्‍यसेवा संस्‍थांसाठी विश्‍वसनीय भागीदार म्‍हणून सिद्ध ठरली आहे आणि या रूग्‍णवाहिकेने तिच्‍या एर्गोनॉमिक, कार्यक्षम डिझाइन व कामगिरीच्‍या माध्‍यमातून अनेकांचे जीवन वाचवले आहे.

_MPC_DIR_MPU_II

टाटा मोटर्सची ग्राहकांच्‍या विविध उपयोजनांसाठी गरजा माहिती असण्‍यासोबत या आवश्‍यकतांची पूर्तता करणारी वेईकल डिझाइन करण्‍याची क्षमता त्‍यांच्‍या प्रति‍स्‍पर्धींपेक्षा वेगळे ठरवते.

टाटा मोटर्स देशातील हॉस्पिटल्‍स आणि आरोग्‍यसेवा सुविधांसाठी उच्‍चस्‍तरीय आरोग्‍यसेवा गतीशीलता सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती, तसेच सरकारला या महामारीविरोधातील लढ्यामध्‍ये साह्य करण्‍यासाठी कटिबद्ध आहे.

टाटा मोटर्स विंगर रूग्‍णवाहिका सर्व प्रकारच्‍या रूग्‍ण परिवहनासोबत बेसिक लाइफ सपोर्ट व अ‍ॅडवान्‍स लाइफ सपोर्ट श्रेणीची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली असून ती उत्तम सेवा देते.

ही रूग्‍णवाहिका विशेषत: कोविड-19 रूग्‍णाच्‍या परिवहनासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे आणि यामध्‍ये ड्रायव्‍हर पार्टिशन देखील आहे. या रूग्‍णवाहिकेमधील मॉड्युलर अंडरपिनिंग्‍ज व मोनोकोक चेसिससह स्‍वतंत्र सस्‍पेंशन सुलभ ड्रायव्हिंगचा अनुभव देतात. जे रूग्‍णांच्‍या सुलभ परिवहनासाठी अत्‍यंत महत्त्वाचे आहे. टाटा मोटर्स डबल स्‍ट्रेचर असलेल्‍या मॅजिक एक्‍स्‍प्रेस ॲम्‍बुलन्‍स, विंगर ॲम्‍बुलन्‍स आणि एलपी 410 ॲम्‍बुलन्‍स अशी रूग्‍णवाहिकांची व्‍यापक श्रेणी देते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment