Tata Motor’s: टाटा पंच ठरली सर्वात वेगवाने, 1 लाख विक्रीचा टप्पा पार करणारी एसयूव्ही

एमपीसी न्यूज : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव ब्रॅण्डने शुक्रवारी (दि.12) टाटा पंच या भारतातील पहिल्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे 1 लाखावे युनिट, पुण्यातील उत्पादन कारखान्यातून सर्वांपुढे आणले. (Tata Motor’s) ऑक्टोबर 2021 मध्ये लाँच झाल्यापासून, केवळ 10 महिन्यांच्या काळात हा टप्पा सर करणारी टाटा पंच ही पहिली एसयूव्ही ठरली आहे आणि उद्योगक्षेत्रात या गाडीने एक नवीन मापदंड स्थापन केला आहे. अफलातून डिझाइन, दमदार कामगिरी व वर्गातील सर्वोत्तम पंचतारांकित सुरक्षितता यांच्या जोरावर या गाडीला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

टाटा पंच हा ‘न्यू फॉरएव्हर’ श्रेणीतील सर्वांत नवीन सदस्य आहे आणि 7 इंची टचस्क्रीन प्रणाली, डिजिटल उपकरणांचा संच, ऑटो एसी, स्वयंचलित हेडलाइट्स, कनेक्टेड कार टेक आणि क्रुइझ कंट्रोल अशा लक्षणीय सुविधांनी युक्त आहे. हॅचचे चापल्य आणि एसयूव्हीची जातकुळी यांचा मिलाप साधणारी टाटा पंच भारतातील पहिल्या 10 सर्वाधिक विक्रीच्या गाड्यांमध्ये सातत्याने आहे.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा या टप्प्याबद्दल म्हणाले, ही आमच्या ‘न्यू फॉरएव्हर’ पोर्टफोलिओतील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हींपैकी एक आहे. या यशामधून ग्राहकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद दिसून येतो (Tata Motors) आणि त्यांनी सातत्याने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. पंच हे अल्फा आर्किटेक्चरवर आधारित असे आमचे दुसरे उत्पादन आहे आणि एक नवीन विभाग तयार करून तसेच अफलातून डिझाइन, वैविध्यपूर्ण व खिळवून ठेवणारी कामगिरी, प्रशस्त व मोकळी अंतर्गत रचना आणि संपूर्ण सुरक्षितता ही खऱ्या एसयूव्हीची चार गाभ्याची तत्त्वे बळकट करून, या उत्पादनाने स्वत:ची लोकप्रियता यशस्वीरित्या प्रस्थापित केली आहे. पंचला ग्राहकांचे प्रेम सातत्याने मिळत राहील आणि ती आपल्या कामगिरीद्वारे एसयूव्हीच्या अनुभवाची व्याख्या नव्याने करत राहील, असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.

Smart City : स्मार्ट सिटी प्रकल्प जुलै 2023 पर्यंत पूर्ण करा – राहुल कपूर

2021 मध्ये लाँच झाल्यापासून टाटा पंच तिच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपासाठी ओळखली जाते. तिच्या स्वरूपात वैविध्य आहे, तरीही ती तिच्या मूळ स्पंदनांशी जोडलेली आहे. (Tata Motor’s) वेगवेगळ्या दरबिंदूंवर पंच ग्राहकांना निवडीसाठी विस्तृत पर्यायांची मालिका देऊ करते. ग्राहकांच्या गरजांचा विस्तृत पट लक्षात घेऊन पंचची निर्मिती करण्यात आली आहे. जुलै 22 मध्ये पंचच्या विक्रीने उच्चांक गाठला होता. या महिन्यात 11 हजार 7 युनिट्सची विक्री झाली होती. 1.2 लिटर पेट्रोल इंजिनची शक्ती लाभलेली टाटा पंच मॅन्युअलमध्ये 18.82 किलोमीटर प्रतिलिटर, तर एएमटीमध्ये 18.97 किलोमीटर प्रतिलिटर एवढी उत्तम इंधन कार्यक्षमता दाखवते. एमटी व एएमटी अशा दोन्ही ट्रान्समिशन

पर्यायांमध्ये उपलब्ध असलेली, पंच ही भारतातील सर्वांत सुरक्षित सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. तिला फाइव्ह स्टार जीएनसीएपी रेटिंग आहे.(Tata Motor’s) ही कार 8 वेगवेगळ्या रंगांमध्ये तसेच ड्युअल टोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. एलईडी डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅण्प्स, एलईडी टेल लॅम्प्स, रेन-सेन्सिंग वायपर्स, ऑटो-फोल्ड ओआरव्हीएम, 16 इंची डायमंड-कट अलॉय, 7 इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली, स्वयंचलित तापमान नियंत्रण, सेमी-डिजिटल उपकरणांचा संच अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांनी युक्‍त पंचचा अधिक आरामदायीपणा देण्‍याचा मनसुबा आहे. तसेच टाटा पंच आयआरए कनेक्टेड कार तंत्रज्ञान आहे, ज्‍यामध्‍ये 25 हून अधिक वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामुळे ही कार तिच्‍या ग्राहकांसाठी परिपूर्ण पॅकेज आहे.

ऑफर्स तसेच कार खरेदीच्या पर्यायांविषयी अधिक माहिती घेण्यासाठी, तुमच्या जवळच्या डीलरशिपशी संपर्क साधा किंवा भेट द्या- https://cars.tatamotors.com/

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.