TATA : टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीमध्ये ऑगस्ट महिन्यात 36 टक्क्यांनी वाढ

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सच्या देशांतर्गत व आतंरराष्ट्रीय वाहन विक्रीमध्ये केवळ ऑगस्ट या एका महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.ही विक्री ऑगस्ट 2021 मध्ये 57 हजार 995 एवढी होती, ती ऑगस्ट 2022 मध्ये 78 हजार 883 एवढ्या वाहनांची विक्री करण्यात आली आहे.

यामध्ये देशांतर्गत वाहन विक्रीमध्ये ऑगस्ट 2021 या महिन्यात 54 हजार 190 वाहन विक्री झाली होती. तर ऑगस्ट 2022 मध्ये 76 हजार 479 एवढ्या गाड्यांची देशांतर्गत विक्री करण्यात आली आहे.

यामध्ये देशांतर्गत कमर्शीअल वाहन विक्रीमध्ये एकूण 6 टक्क्यांची वाढ झाली आहे.ही विक्री 2021 साली 29 हजार 781 एवढी होती ती आता ऑगस्ट 2022 मध्ये 31 हजार 492 एवढी झाली आहे.तर देशांतर्गत पॅसेंजर वाहन विक्रीमध्ये 68 टक्क्यांची वाढ झाली असून ऑगस्ट 2021 मध्ये एकूण 28 हजार 18 वाहने विकली गेली होती ती संख्या 2022 मध्ये 47 हजार 166 एवढी होती.

देशांतर्गत व आतंरराष्ट्रीय उद्योगात बस व ट्रक यांची एकूण विक्री पाहता ऑगस्ट 2021 महिन्यात हा अकडा 10 हजार  953 एवढा होता तर  तोच अकडा ऑगस्ट 2022 मध्ये वाढून 12 हजार 846 वर पोहचला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.