Tata Motors News : विवो आयपीएल 2021 साठी टाटा सफारी ऑफिशियल पार्टनर

एमपीसी न्यूज – बीसीसीआय सोबत सलग चौथ्‍या वर्षी सहयोग कायम राखत टाटा मोटर्सने आयपीएलचा अधिकृत पार्टनर म्हणून घोषणा केली. नवीन टाटा सफारी विवो आयपीएल 2021 साठी ऑफिशियल पार्टनर असणार आहे. यंदा ही स्‍पर्धा भारतात होत आहे. 9 एप्रिलपासून चेन्नई मधून स्पर्धेला सुरूवात होईल.

आयपीएलचे सामने चेन्नई, दिल्‍ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता सहा शहरांत खेळवले जाणार आहेत. अंतिम टप्‍प्‍यातील सामने अहमदाबाद येथे खेळवण्‍यात येतील.

याप्रसंगी बोलताना टाटा मोटर्सच्‍या पॅसेंजर वेईकल बिझनेस युनिटचे विपणन प्रमुख विवेक वत्‍स म्‍हणाले, ‘यंदा आयपीएल स्‍पर्धा आमच्‍यासाठी खास आहे. आयपीएल पुन्‍हा भारतात खेळवण्‍यात येत आहे. सलग चौथ्‍या वर्षी बीसीसीआयसोबतचा आमचा सहयोग कायम ठेवण्‍याचा आनंद होत आहे.

नवीन सफारीला प्रिमिअम डिझाइन, दर्जात्‍मक वैशिष्‍ट्ये आणि उल्‍लेखनीय आरामदायी सुविधेसाठी ग्राहकांनी प्रशंसा करण्‍यासोबत उत्तम प्रतिसाद दिला आहे. ही कार नवीन अवतारात आयपीएलमध्‍ये पदार्पण करत आहे. आमचा आवडता खेळ व क्रिकेट लीगचा आनंद शेअर करण्‍याची आम्ही आशा व्‍यक्‍त करतो असे, वत्‍स म्हणाले.

_MPC_DIR_MPU_II

सातत्‍यपूर्ण सहयोगाबाबत  आयपीएलचे अध्‍यक्ष ब्रिजेश पटेल म्‍हणाले, ‘यंदाच्‍या विवो आयपीएलसाठी टाटा मोटर्स नवीन टाटा सफारीसह त्‍यांचा सहयोग कायम ठेवताना आम्ही उत्‍सुक आहोत. टाटा मोटर्स 2018 पासून स्‍पर्धेची ऑफिशियल पार्टनर राहिली आहे आणि त्‍यांच्यासोबत आमचे नाते प्रत्‍येक वर्षी अधिकाधिक प्रबळ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

ऑफिशियल पार्टनर म्‍हणून टाटा मोटर्स चेन्‍नई, मुंबई, दिल्‍ली, बेंगळुरू, कोलकाता व अहमदाबाद येथील मैदानावर नवीन सफारी प्रदर्शनासाठी ठेवेल. मागील वर्षाप्रमाणे यंदा देखील आयपीएल सामन्‍यांमध्‍ये आकर्षक सुपर स्‍ट्रायकर अवॉर्डस् असणार आहेत, जेथे सामन्‍यातील सर्वोच्‍च स्‍ट्राइक रेट असलेल्‍या खेळाडूला लोकप्रिय सुपर स्‍ट्रायकर ट्रॉफीसह एक लाख रूपयांचे बक्षीस देण्यात येईल.

नवीन टाटा सफारी ही कार आधुनिक, बहुआयामी जीवनशैलीसाठी आकर्षक डिझाइन, विविधता, आलिशान व आरामदायी इंटीरिअर्स आणि उल्‍लेखनीय कार्यक्षमता असणारी वैशिष्‍ट्यांनी युक्‍त आहे.

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या

https://cars.tatamotors.com/suv/safari

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.