_MPC_DIR_MPU_III

Tata Nexon EV : टाटा मोटर्सतर्फे एक हजारावी नेक्‍सॉन ईव्‍ही सादर

सर्वांच्या पसंतीस उतरलेली ही कार भारतात ईव्‍ही विभागामधील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. : Introducing 1000V Nexon EV by Tata Motors

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सने पुण्यातील प्लॅन्टमध्ये एक हजारावी नेक्‍सॉन ईव्‍ही सादर करत इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्‍ही) विभागातील महत्वपूर्ण टप्‍प्‍याची घोषणा केली आहे. व्‍यावसायिक सादरीकरणाच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्‍ये हा टप्पा टाटा मोटर्सने गाठला आहे. सर्वांच्या पसंतीस उतरलेली ही कार भारतात ईव्‍ही विभागामधील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

याबाबत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल बिझनेसचे अध्‍यक्ष शैलेश चंद्रा म्हणाले की, इलेक्ट्रिक व्हेईकल बाबत लोकांची रूची झपाट्याने वाढत आहे. देशाच्‍या कानाकोप-यातून या गाडीसाठी मागणी वाढत आहे.

कोरोनाच्या काळात देखील मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे अल्‍पावधीत नेक्‍सॉन ईव्‍ही गाडीची 1000 उत्पादने बाहेर आली आहेत.

चंद्रा पुढे म्हणाले, टाटा माटर्स जागतिक दर्जांनुसार नाविन्‍यपूर्ण व व्‍यापक अशा स्थिर मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स विकसि‍त करण्याचे प्रयत्‍न सुरूच ठेवेल.

इलेक्ट्रिक व्हेईकल भविष्य असून, नेक्‍सॉन ईव्‍ही ग्राहकांसाठी प्रमुख निवड बनवण्‍यासाठी टाटा मोटर्स कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कार्ससंदर्भात ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांची सातत्‍याने पूर्तता केली आहे. ज्यामध्ये टिगोर ईव्‍ही इलेक्ट्रिक सेदान 140 किमी व 213 किमी रेंजमध्ये आणि वैयक्तिक विभागांत एकाच चार्जमध्‍ये 312 किमीचे अंतर विनासायास पार करणारी नेक्‍सॉन ईव्‍ही इलेक्ट्रिक एसयूव्‍ही या कार सादर केल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

कनेक्‍टेड ड्राइव्‍हचा अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या नेक्‍सॉन ईव्‍ही उत्‍सर्जनरहित असून, आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे.

नेक्‍सॉन ईव्‍हीने तिच्‍या विभागामध्‍ये अद्वितीय बेंचमार्क स्‍थापित केला आहे. भारतामध्‍ये नेक्‍सॉन ईव्‍हीची उपलब्‍धता व वापर वाढवण्‍यासाठी कंपनीने सामायिक अर्थव्‍यवस्‍थेच्‍या झपाट्याने वाढत असलेल्‍या युगामध्‍ये ओनरशीपपेक्षा युजरशीपला प्राधान्‍य दिले आहे.

त्यानुसार कंपनीने ग्राहकांसाठी उपयुक्‍त असे नोव्‍हल ईव्‍ही सबस्क्रिप्‍शन मॉडेल सादर केले आहे.

भारतात ईव्‍ही व्हेईकल अवलंबतेला चालना देण्‍यासाठी टाटा मोटर्सने इतर टाटा ग्रुप कंपनीजची क्षमता व अनुभवांचा लाभ घेत सर्वांगीण मोबिलिटी इकोसिस्‍टम टाटा युनिईव्‍हीअर्स देखील सादर केली.

या माध्‍यमातून अनिवार्य ईव्‍ही वातावरणाची निर्मिती केली जाते. टाटा युनिईव्‍हीअर्सच्‍या माध्यमातून ग्राहकांना ई-मोबिलिटी ऑफरिंग्‍जची रेंज उपलब्‍ध असेल.

या रेंजमध्‍ये चार्जिंग सोल्‍यूशन्‍स, नाविन्‍यपूर्ण रिटेल अनुभव व सुलभ फायान्सिंग या पर्यायांचा समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.