_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Tata Nexon : टाटा नेक्सॉनची घौडदौड सुरूच ! दोन लाख कार उत्पादनाचा टप्पा पूर्ण  

0

एमपीसी न्यूज –  टाटा मोटर्सच्या  नेक्सॉनची विक्रमी घौडदौड सुरूच आहे. नेक्सॉन कार उत्पादनाचा दोन लाखांचा टप्पा पार झाला आहे. नुकतेच रांजनगाव येथील प्लॅन्ट मधून कारचे दोन लाखावे उत्पादन बाहेर पडले. टाटाने जवळपास सहा महिन्यात पन्नास हजार कार निर्माण केल्या आहेत. कॉम्पॅक्ट एसयुव्ही या प्रकारात नेक्सॉन भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणा-या पहिल्या तीन पैकी एक कार आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये टाटा नेक्सॉनची दीड लाख उत्पादन पूर्ण झाली होती. त्यानंतर सहा महिन्यापेक्षा कमी वेळात कारने दोन लाख उत्पादानाचा टप्पा पूर्ण झाला आहे. नेक्सॉन टाटा मोटर्सची मागील काही वर्षातील सर्वात जास्त विक्री झालेली कार ठरली आहे. भारतात सर्वात जास्त विक्री होणा-या दहा कारमध्ये नेक्सॉनचा समावेश झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

नेक्सॉनची मागणी दिवसेंदिवस वाढत असून मार्चमध्ये 8 हजार 683 युनिटस् विक्री झाली. ग्लोबल एनसीएपी यांच्याद्वारे आयोजित क्रैश टेस्ट मध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त करणारी नेक्सॉन भारतील पहिल्या कारपैकी आहे. 2017 मध्ये लॉन्च केलेली नेक्सॉन सध्या 20 व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. त्यापैकी 12  पेट्रोल आणि 5 डिझेल व्हेरिएंट ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत.

नेक्सॉन एसयूव्ही च्या किमतीत नुकतीच टाटाने वाढ केली आहे. बेस मॉडेल नेक्सॉनच्या किंमतीत 10 हजार रूपये वाढवण्यात आले आहेत. XE व्हेरिएंट ज्याची किंमत 7.09 लाख (एक्स-शोरूम) होती ती आता 7.19 लाख (एक्स-शोरूम) एवढी झाली आहे. तसेच, टॉप-स्पेक ट्रिम XZA+ (O) डुअल टोन व्हेरिएंट याची किंमत 12.95 लाख (एक्स-शोरूम) असेल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment