TATA Safari : टाटा सफारी एसयूव्हीच्या 10,000 व्या युनिटचे उत्पादन

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सने पुण्यातील उत्पादन प्रकल्पात नुकत्याच लाँच झालेल्या सफारी एसयूव्हीच्या 10,000 व्या युनिटचे उत्पादन केले आहे. कंपनीने मंगळवारी याबाबत माहिती दिली. टाटा मोटर्सने फेब्रुवारीमध्ये ही सात सीटर एसयुव्ही लाँच केली होती. या महिन्यात 100 युनिट उत्पादन झाले होते. मात्र, त्यानंतरच्या चार महिन्यांत 9 हजार 900 कारचे उत्पादन करण्यात आले आहे.

नव्या टाटा सफारीला डायनामिक डिझाइन, आरामदायक थ्री-रो सीटिंग, प्रीमियम इंटीरियर, कीन ड्राइव्हिंग एक्सपीरिअंस आणि सुरक्षा सुविधांनी युक्त बनविल्याचे कंपनीने सांगितले आहे.

टाटा सफारीमध्ये थ्री-रो एसयूव्ही च्या मधल्या सीटमध्ये एक बेंच सीटसोबत सहा सीटचा ऑप्शन देण्यात आला आहे. तर दुसऱ्या रो मध्ये कॅप्टन सीटसोबत सात सीटचा ऑप्शन देण्यात आला आहे. हॅरिअरसारखेच डिझाईन देण्यात आले आहे. टाटाने नवी सफारी ओमेगा आर्क प्लॅटफॉर्मवर बनविली आहे. याच प्लॅटफॉर्मवर लक्झरिअस एसयुव्ही लॅन्ड रोव्हर बनविली जाते. महत्वाचे म्हणजे टाटाची हॅरिअरदेखील OMEGARC डिझाईनवरच बनविण्यात आले आहे. हा लँडरोव्हरचा D8 प्लेटफॉर्म आहे.

क्रायोटिक इंजिन :

टाटा मोटर्सचे डिझेल इंजिन खूप ताकदवान मानले जातात. या SUV मध्ये कंपनीने 2.0 लीटर क्षमतेचे क्रायोटिक टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. जे 170hp आणि 350 एनएम चा पीक टॉर्क तयार करते. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स ने हे इंजिन लेस आहे. सफारीला XE, XM, XT, XT +, XZ आणि XZ + मध्ये आणण्यात आले आहे. ऑटोमॅटीक ट्रान्समिशनसोबत कार 14.8 kmpl मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.

या कारमध्ये या सेगमेंटमधील सर्वात मोठी सनरुफ पहायला मिळणार आहे. टाटा सफारी पहिल्यांदा 1998 मध्ये लाँच झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.