Tata Sky : टाटा स्काय बिंज अॅप आता स्मार्टफोनवर उपलब्ध

एमपीसी न्यूज :  टाटा स्काय या भारतातील एका आघाडीच्या पे टीव्ही व्यासपीठाने टाटा स्काय बिंज या आपल्या अग्रणी कंटेंट अॅग्रीगेटर सेवेचे लाभ आता टाटा स्काय बिंज मोबाइल अॅप सादर करून मोबाइलमध्येही देऊ केले आहेत. मेक टुमारो बेटर दॅन टुडे म्हणजेच भविष्य आजच्यापेक्षा अधिक चांगले बनवण्याच्या आपल्या ब्रँडच्या उद्देशाला अनुसरून टीव्हीवरील आणि आता मोबाइलवरील टाटा स्काय बिंज सर्व प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजन त्यांच्या आवडीच्या स्क्रीनवर उपलब्ध करून देण्यास सज्ज आहे.

टाटा स्काय बिंजच्या मूळ उद्दिष्टांमध्ये कंटेंटला प्राधान्य देण्याचाही समावेश आहे. याप्रकारच्या या पहिल्याच ओटीटी अॅग्रीगेशन अॅपमध्ये न्यू रीलीजेस, पॉप्युलर मुव्हीज, ट्रेंडिंग नाऊ अशा विविध विभागांमध्ये बहुविध स्ट्रीमिंग सेवांचा खास निवडलेला कंटेंट उपलब्ध असल्याने कंटेंटचा शोध घेणे सोपे होते.

लँग्वेज, जॉनर, अॅप रेल्स अशाप्रकारे कंटेंट सर्फिंग केल्याने सर्च आणि रीकमेंडेशन्स वेगवान आणि अधिक सोयीस्कर बनतात. स्क्रीनच्या तळाशी असलेल्या टॅब बारमुळे अगदी सहज होम स्क्रीन, सर्च आणि वॉच लिस्टचा अॅक्सेस मिळतो. सिंगल सबस्क्रिप्शन, सिंगल पेमेंट आणि युनिफाइड व्यासपीठावर कंटेंट पाहण्यासाठी सिंगल साइन-ऑन यामुळे हा अनुभव फारच मनोरंजक होतो

ओटीटी कंटेंटचा अनुभव अधिक व्यापक प्रमाणावरील सबस्क्राइबर्सपर्यंत पोहोचावा या उद्देशाने टाटा स्काय बिंज मोबाइल अॅप दोन आकर्षक प्लॅन्ससोबत सादर करण्यात आला आहे. टाटा स्काय बिंज 299 प्लॅन घेणाऱ्या सबस्क्राइबर्सना 1 टीव्ही स्क्रीनवर  अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक- टाटा स्काय एडिशन किंवा बिंज+STB आणि 3 मोबाइल स्क्रीन्सवर 10 ओटीटी अॅप्सचा कंटेंट उपलब्ध होईल.

149 मोबाइल-ओन्ली प्लॅनमध्ये 3 मोबाइल स्क्रीन्सवर 7 प्रीमिअम ओटीटी अॅप्सवरील कंटेंटसह बिंज सेवा उपलब्ध होणार आहेत . मोबाइल अॅप डाऊनलोड करणाऱ्या सर्व नव्या बिंज वापरकर्त्यांना 7 दिवसांसाठी मोफत चाचणीही घेता येणार आहे.

या सादरीकरणाबद्दल टाटा स्कायच्या चीफ कंटेंट अॅण्ड कमर्शिअल ऑफिसर पल्लवी पुरी म्हणाल्या, “टाटा स्काय बिंज मोबाइल अॅप सादर करणे म्हणजे अधिक मोठ्या प्रेक्षकसंख्येला आमची उत्पादने उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांतील एक पुढचे पाऊल आहे.

आमच्या सबस्क्राइबर्सना आता त्यांचा आवडीचा ओटीटी कंटेंट मोठ्या आणि छोट्या स्क्रीन्सवर, घरी किंवा बाहेर असताना, युनिफाइड इंटरफेस, सिंगल सबस्क्रिप्शन आणि साइन-ऑनसह पाहता येईल.” मोबाइल अॅपवर टाटा स्काय बिंज सादर करून आम्ही अशा प्रेक्षकांपर्यंत पोहोचू जे ओटीटी कंटेंट पाहतात पण त्यांना वैयक्तिक डिव्हाइसेस वापरायची असतात किंवा बाहेर असतानाही त्यांना हे पहायचे असते.”

सिंगल सबस्क्रिप्शन आणि युनिफाइड युजर इंटरफेसमुळे डिस्ने+ हॉटस्टार प्रीमिअम, झी5, सननेक्स्ट, हंगामा प्ले, इरॉस नाऊ, शेमारूमी, वूट सीलेक्ट, वूट किड्स, सोनीलिव्ह आणि क्युरिऑसिटीस्ट्रीम अशा भागीदार अॅप्सचा कंटेंट उपलब्ध होतो. अतिरिक्त प्राइम सबस्क्रिप्शनसह मोठ्या स्क्रिनवर अॅमेझॉन प्राइम पाहता येईल.

फायर टीव्ही स्टिक-टाटा स्काय एडिशन किंवा बिंज+ सेट टॉप बॉक्सवर टाटा स्काय बिंज सबस्क्रिप्शन असणाऱ्या टाटा स्काय सबस्क्राइबर्सना त्यांचा सबस्क्राइबर आयडी किंवा नोंदणीकृत मोबाइल नंबर वापरून बिंज मोबाइल अॅपवर लॉग इन करता येईल आणि कंटेंट पाहता येईल. ग्राहकांना मोबाइल-ओन्ली प्लॅन निवडण्याचा पर्यायही आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.