Tata Tigor EV : नवीन ईलेक्ट्रिक ‘टाटा टिगॉर’ तंत्रज्ञान, सुविधा आणि सुरक्षा यांनी सुसज्ज; बुक करा फक्त 21 हजारात

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक नेक्सन ईव्ही ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरत असून, बाजारातील ईलेक्ट्रिक क्षेत्रात 70 टक्के भागीदारी ईलेक्ट्रिक नेक्सनची आहे. नेक्सन ईव्हीच्या यशानंतर टाटा ईलेक्ट्रिक विभागात दुसरी कार घेऊन येत आहे. निळ्या रंगातील नवीन ईलेक्ट्रिक टिगॉरचा आवतार नुकताच कंपनीमार्फत सार्वजनिक करण्यात आला.

तंत्रज्ञान, सुविधा आणि सुरक्षा यांनी सुसज्ज असलेल्या नवीन ईलेक्ट्रिक टाटा टिगॉरच्या बुकिंगला आजपासून सुरूवात झाली असून, फक्त 21 हजार रूपयांत ही कार बुक करता येणार आहे.

झिपट्रॉन हे टाटा मोटर्सच्या क्रांतिकारी इलेक्ट्रिक वाहनांच्या केंद्रस्थानी आहे. इलेक्ट्रिकचे सर्व गुण सामावून घेण्याचे हे वाहन तंत्रज्ञान आहे. टिगॉर ईव्ही 55 किलोव्हॅट पीक पॉवर आउटपुट आणि 170 नॅनो मीटर एवढा पीक टॉर्क देते. 5.7 सेकंदात 60 किमी प्रति तास एवढे अंतर गाठू शकते. ही कार 26 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह येते जी सर्वात जास्त ऊर्जा प्रदान करते. टिगॉर ईव्ही कारमध्ये IP 67 रेटेड बॅटरी पॅक आणि मोटर आहे, ज्यामध्ये 8 वर्ष आणि 1 लाख 60 हजार किलो मीटर बॅटरी आणि मोटर वॉरंटी आहे.

टाटा मोटर्सच्या पॅसेंजर आणि इलेक्ट्रिक व्हेईकल्स बिझनेस युनिटचे मार्केटिंग हेड विवेक श्रीवत्स म्हणाले, ‘सुरूवातीला अगदी थोडे लोक इलेक्ट्रिक वाहनांच्या पर्यायाचा अवलंब करत होते. आता बहुसंख्य लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळाले आहेत. नेक्सन ईव्हीच्या यशस्वी अनुभवासह, आम्ही आत्मविश्वासाने सांगू शकतो की ईव्ही झपाट्याने मुख्य प्रवाहात येत आहे. ईव्ही मार्केट वेग घेत आहे, ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्याला आणखी वैविध्यपूर्ण करण्याची आवश्यकता आहे. वैयक्तिक विभागात टाटाच्या दुसऱ्या इलेक्ट्रिक कारचे अनावरण करण्यासाठी आम्ही उत्साही आहेत. यासह ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील कंपन्यांना इलेक्ट्रिककडे वळण्याचा संदेश आम्ही देत आहोत.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.