Tathavade Crime News : किराणा दुकानदाराची फसवणूक केल्याप्रकरणी दोन डॉक्‍टरांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – किरणा दुकानदाराकडून माल खरेदी करून त्याचे साडेचार लाख रुपये न देता फसवणूक केली. याबाबत दोन डॉक्‍टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ताथवडे येथे 30 सप्टेंबर 2020 ते 1 ऑक्‍टोबर 2020 या कालावधीत घडली.

डॉ. आशुतोष दुबे (रा. भूमकर चौक, वाकड) आणि डॉ. तुषार पारीख ऊर्फ लोहार (मोबाइल क्रमांक 8452044300) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी डॉक्‍टरांची नावे आहेत. अरूणकुमार अमरितलाल शुक्‍ला (वय 48, रा. कन्हैया पार्क, थेरगाव) यांनी गुरुवारी (दि. 4) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्‍ला यांचे ताथवडे येथे प्रदीप ट्रेडर्स नावाचे किरणा मालाचे दुकान आहे. आरोपी डॉक्‍टरांनी आपसांत संगनमत करून फिर्यादी शुक्‍ला यांना तुम्ही माल टाका नंतर पैसे देतो, असे सांगून चार लाख 58 हजार 460 रुपयांचा किरणा माल घेतला व त्याचे अद्यापही पैसे न देता फसवणूक केली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.