-MPC-TOP-MOST-BANNER-I

Tathavade Crime News : भर रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; आरोपी अटकेत

तक्रार दिल्यास खानदानाला संपवण्याची धमकी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – आई आणि भावासोबत जात असलेल्या अल्पवयीन मुलीला भर रस्त्यात अडवून तिच्यशील अश्लील चाळे केले. त्यानंतर या प्रकाराबाबत तक्रार दिल्यास संपूर्ण खानदानाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 26) सायंकाळी सहा वाजता ताथवडे चौकात घडली. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

आसिफ महम्मद शेख (वय 21, रा. भुजबळ वस्ती, ताथवडे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला, त्यांची अल्पवयीन पीडित मुलगी आणि फिर्यादी यांचा मुलगा असे तिघेजण शनिवारी सायंकाळी सहा वाजता ताथवडे चौकातून पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी आसिफ तिथे आले. त्याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्याशी अश्लील चाळे केले. मुलीचा विनयभंग करून जात असताना आरोपी आसिफ याने ‘माझ्या विरोधात तक्रार दिल्यास तुमच्या संपूर्ण खानदानाला जीवे मारून टाकीन’ अशी धमकी दिली. पोलिसांनी आरोपी आसिफ याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.