Tathavade : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या खाद्यमहोत्सवात मंगळवारी दरवळणार ‘पंजाब दि महक’

एमपीसी न्यूज – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान होण्यासाठी व पारंपरिक पंजाबी खाद्यसंस्कृतीचे दर्शन लोकांना व्हावे यासाठी डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेकनॉलॉजी ताथवडे यांच्या तर्फे मंगळवारी (दि. 18) ‘पंजाब दि महक’ या खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा महोत्सव ताथवडे येथे महाविद्यालयाच्या आवारात रात्री 7नंतर खुला राहील. या महोत्सवानिमित्त स्वतः विद्यार्थ्यांनी बनवलेल्या टोमॅटो धनिया शोरबा, अमृतसरी मच्छी, पनीर लबाबदार गुलाबजाम, जलेबी, फिरणी या सारख्या 35 वेगवेगळ्या डिशेश चाखायला मिळणार आहेत. सोबत मनोरंजन म्हणून संगीत आणि वेगवेगळे नृत्याविष्कारही पाहायला मिळणार आहेत.

जेवण बनवण्यापासून ते सादर करण्यापर्यंत या खाद्य महोत्सवाचे संपूर्ण नियोजन विद्यार्थ्यांकडून केले जाते. ‘पंजाब दि महक’ खाद्य महोत्सवासाठी 600 रुपयांचा प्रवेश पास असणार आहे. पंजाबच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घायचा असेल तर पंजाब दि महक खाद्य महोत्सव खाद्यप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.