Tathavade : रावेत-औंध रस्त्यावरील कचरा पेट्या हटविण्याची मागणी

एमपीसी न्यूज- एकीकडे पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करीत असताना दुसरीकडे रस्त्यावर कचऱ्याने काठोकाठ भरलेल्या कचरा पेट्यांचे दृश्य पाहायला मिळत आहे. रावेत- औंध रस्त्यावर मधोमध ताथवडे येथे एका मागोमाग एक पिंपरी महापालिकेच्या कचरा पेट्या ठेवलेल्या दिसून येत आहेत. महापालिकेच्या संबंधित विभागाने या कचरा पेट्या रिकाम्या करून रस्त्याच्या कडेला ठेवाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.