Tathawade : बस सीट वरून महिलेची साडेचार लाखांच्या दागिन्यासह पर्स चोरीला

एमपीसी न्यूज – जेवणासाठी हॉटेलवर थांबलेल्या बस मधून महिलेची (Tathawade) साडे चार लाख रुपयांच्या दागिन्यांसह पर्स चोरीला गेली आहे.ही घटना रविवारी (दि.12) रात्री ताथवडे येथे घडली आहे.

याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

Tathawade : चापट मारल्याचा जाब विचारला म्हणून तरुणाला दगडाने बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मुंबईवरून सांगलीला एका खाजगी ट्रॅव्हल्स ने निघाल्या होत्या. यावेळी ताथवडे येथे एका हॉटेलवर बस जेवणासाठी थांबली.  फिर्यादी यांनी त्यांची पर्स त्यांच्या सीटवर ठेवली होती. त्या परत आल्या असता तिथून त्यांची पर्स चोरीला गेली होती. पर्समध्ये 4 लाख 43 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. यावरून वाकड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत (Tathawade) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.