Tathawade : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्या वतीने टीचर्स ट्रेनिंग कार्यक्रमात ‘आदर्श शिक्षकांचा सन्मान’

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्या वतीने अश्विनी इंटरनॅशनल स्कूल ताथवडे येथे नुकताच टीचर्स ट्रेनिंग कार्यक्रम आणि आदर्श शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रो. माधवी वझे (डिस्ट्रिक ऑफिसर), पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे मा. उपाध्यक्ष नाना शिवले, क्लबचे अध्यक्ष रो. बाळासाहेब उ-हे, सेक्रेटरी रो सारंग माताडे, रो. सचिन पाटिल आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षकासाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात सारंग माताडे आणि अलकनंदा माताडे यांनी मार्गदर्शन केले. आदर्श शिक्षक सन्मान वेगवेगळ्या शाळांच्या 9 शिक्षकांना देण्यात आला. यामध्ये हिंदुस्थान अँटिबायोटिक्स हायस्कूलच्या कविता गायकवाड, विजया तरटे, गुलबाई इराणी कन्या शाळेच्या वैशाली वाघ, अश्विनी इंटरनॅशनल स्कूलच्या नीती श्रीवास्तव, मयुरा यादव, श्रावणी शिंदे, प्रेरणा माध्यमिक शाळेचे दादासाहेब शेजाळ आणि पद्मश्री वसंतदादा पाटील हायस्कूलच्या शिक्षक आदींचा समावेश होता.

प्रशिक्षण कार्यक्रमात 60 शिक्षकांनी सहभाग घेतला. रोटरीचे सदस्य रो सचिन पवार यांनी त्यांची अश्विनी इंटरनॅशनल स्कूल ह्या शाळेच्या हॉलमध्ये जागा उपलब्ध करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी अभंग यांनी केले. आभार क्लबच्या माजी अध्यक्ष रो वर्षा पांगरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.