Tathawade : आई व मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला बेड्या

एमपीसी न्यूज – मागील चार दिवसांपासून आई व मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केले आहे. हा प्रकार ताथवडे येथे (Tathawade) घडली आहे.

मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार नंदकुमार किसन काळे (रा. ताथवडे) व त्याची पत्नी यांना अटक करण्यात आली आहे.

Bhosari : महिलांच्या व्हॉटसअप डिपीचा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईला अडवून त्यांचा हात धरून सोबत फिरायला येण्यासाठी आरोपीने जबरदस्ती केली. आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादीसोबत गैरवर्तन केले. हा प्रकार फिर्यादी यांनी आईला सांगितल्यानंतर फिर्यादी (Tathawade) व आई या जाब विचारण्य़ासाठी आरोपीच्या घरी गेल्या असता आरोपीच्या पत्नीने फिर्यादी व त्यांच्या आईला मारहाण करत शिवीगाळ केली. यावरून वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.