Tathawde: ताथवडे परिसरात हातात कोयते घेऊन दोन गटात हाणामारी; सात जणांविरोधात गुन्हा

Tathawde: Two groups fight in Tathawde area with axes in hand; Crime against seven people या दहशतीने आजुबाजूच्या लोकांनी आपली घरे व दुकाने बंद केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

एमपीसी न्यूज- ताथवडे परिसरात हातात कोयते घेऊन एकमेकांना जिवे मारण्यासाठी एकत्र आलेल्या व ताथव़डे परिसरात दहशत माजवणाऱ्या दोन गटातील सात जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि.11) सायंकाळी साडेसहा वाजता ताथवडे येथील अशोक नगर येथे घडली.

योगेश चंद्रकांत पवार (वय. 20, रा. अशोक नगर, ताथवडे), सुरज बापू गायकवाड (वय. 20, रा. अशोक नगर, ताथवडे), रविराज राजेंद्र केदार (वय, 21, रा. अशोक नगर, ताथवडे), गौरव कुडाळे, रवण रेरा, साहिल कुंभार (रा. दळवी नगर, आकुर्डी) इतर नावे माहीत नाहीत. यापैकी आरोपी योगेश पवार व रविराज केदार यांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई मयुर पुंडलीक जाधव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसीर, आरोपी योगेश पवार, रविराज केदार यांनी एकमेकांना मारण्याच्या इराद्याने आपापल्या साथीदारांना अशोक नगर परिसरात एकत्र बोलवले. हातात कोयते घेऊन एकत्र आलेल्या जमावाने एकमेकांना शिवागाळ करत जिवे मारण्याची धमकी देऊ लागले तसेच हातातील कोयते हवेत भिरकावत मोठमोठ्याने ओरडत कुणी मध्ये याल तर ठार करू अशी धमकी देत भागात दहशत पसरवली.

या दहशतीने आजुबाजूच्या लोकांनी आपली घरे व दुकाने बंद केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.