Tathwade :  पावणेचार लाखांची घरफोडी

Burglary of Rs. four Lakhs

एमपीसी न्यूज –  बंद फ्लॅटचे सेफ्टी डोअर आणि दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने  शयनगृहातील लाकडी कपाटातील  2 लाख 36 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने, दीड लाखांची रोकड असा 3 लाख 86 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ताथवडे येथे घडली.

विशाल शेखर बोरकर (वय-42, रा. मुंबई) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल यांचा फ्लॅट दि. 10 जानेवारी ते 27 मे या कालावधीत कुलूप लावून बंद होता. या कालावधीत अज्ञात चोरट्यांने त्यांच्या फ्लॅटचे सेफ्टी डोअर आणि दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.

शयनगृहातील लाकडी कपाटातील 2 लाख 36 हजार रूपयांचे 5 तोळे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दीड लाखांची रोकड असा 3 लाख 86 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.