Tathwade: 24 मीटर रस्ता करण्यासाठी 30 कोटींचा खर्च; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ताथवडे येथील 24 मीटर रुंद रस्ता विकसित करण्यात येणार आहे. 24 मीटर रस्त्यासाठी तब्बल 30 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्टर या ठेकेदाराकडून हे काम करुन घेण्यास आज (गुरुवारी) झालेल्या स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

ताथवडे गावठाणपासून जीवननगर मार्गे सर्व्हे नंबर 99 आणि 100 मधून पुनावळेकडे जाणारा 24 मीटर रस्ता विकसित केला जाणार आहे. या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. रॉयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेस वगळून सुमारे 32 कोटी 45 लाख 48 हजार रुपयांची निविदा मागविली होती. व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्टर या ठेकेदाराची निविदा सुमारे 32 कोटी 45 लाख 48 हजार पेक्षा 8 टक्के कमी दराने प्राप्त झाली होती.

सन 2018-19 च्या एसएसआर दरानुसार प्राप्त निविदा स्वीकृत योग्य दरापेक्षा 8.39 टक्क्यांने कमी आहे. त्यामुळे व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्टर या ठेकेदाराची प्राप्त निविदा दराने म्हणजेच 29 कोटी 85 लाख 84 हजार, रॉयल्टी चार्जेस 19 लाख आणि टेस्टींग चार्जेस 1 लाख 68 हजार असे एकूण 30 कोटी 6 लाख रुपयात हे काम या ठेकेदाराला देण्यात आले आहे. त्यांच्यासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.