Tathwade: मारहाणीत एकाचे जबड्याचे हाड मोडले

एमपीसी न्यूज –  ध्वनिक्षेपकाचा आवाज कमी करायला सांगितल्याने झालेल्या वादातून तिघांनी एकाला काठीने बेदम मारहाण करून जबड्याचे हाड मोडले. ही घटना ताथवडे येथे घडली.

सुभाष लक्ष्मण राठोड (वय 42, रा. इंद्रा पब्लिक स्कूलसमोर, ताथवडे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुमित किर्वे आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजता किर्वे यांनी गणेश पाटील यांना ध्वनिक्षेपकाचा आवाज कमी करण्यास सांगितले. त्यावरून झालेल्या भांडणात राठोड हे तेथे गेले असता आरोपींनी राठोड आणि पाटील यांना काठीने बेदम मारहाण केली. यात राठोड यांच्या जबड्याचे हाड मोडून गंभीर दुखापत झाली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.