Tathwade : बालिकेवर लैंगिक अत्याचार; तरुणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.14) ताथवडे येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

प्रताप भाऊराव शिंदे (वय 18 रा. मु.पो. उळे ता. जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची दहा वर्षीय मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. सहायक निरीक्षक महेश स्वामी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.