Tathwade News : शिवज्योत घेऊन निघालेल्या टेम्पोला ताथवडे जवळ कंटेनरची धडक, 35 शिवभक्त जखमी

एमपीसी न्यूज – बंगळुरू- मुंबई बायपासवर ताथवडे येथे शिवज्योत घेऊन (Tathwade News) जाणाऱ्या शिवभक्तांच्या टेम्पोला कंटेनरने जोरदार धडक दिली आहे. ज्यामध्ये 30 ते 35 जण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि.10) सकाळी झाला आहे.

 

 

Vadgaon Maval : पिंपळखुटे येथे महिलांचा ‘तू ही कर्तबगार’ उपाधीने सन्मान

या अपघातात दहा जण गंभीर जखमी झाले आहेत तर वीस जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मल्हारगडावरून शिवज्योत घेऊन हे शिवभक्त एका खासगी टेम्पोने लोणावळ्यामधली शिलाटणे येथे निघाले होते.

 

 

या टेम्पोची एका मोटारसायकललाही धडक बसली आहे. यामध्ये मोटारसायकलस्वारही जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं (Tathwade News) जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.