Tauktae Cyclone News : तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात 1,886 घरांचे नुकसान; तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे. या दरम्यान जिल्ह्यातील आज, सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 1 हजार 886 घरांचे अंशत: नुकसान, तर 5 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. एकूण 3 व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर 2 प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील एकूण 2 हजार 299 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. महावितरणच्या एकूण 65 HT पोलचे, 249 LT पोलचे तर एका ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील एकूण 69 कोविड रुग्णालयांपैकी 31 रुग्णालये थेट वीजपुरवठ्याद्वारे सुरु असून 38 कोविड रुग्णालये जनरेटर बॅकअपवर सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.