Tax Practitioner : करसल्लागार यांच्या योगदानामुळे करप्रणालीमध्ये सुसूत्रता – पंकज घिया

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा 43 वा स्थापना दिन उत्साहात

एमपीसी न्यूज – “करदात्यांना कर भरण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी कर सल्लागार नेहमीच प्रयत्नशील असतात. कररचनेत सुसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या संपूर्ण भारतात करसल्लागारांनी अनेक मागण्या, आंदोलने व शिफारसी केल्या. त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर त्यात अनेक सुधारणा झाल्या, तसेच करप्रणाली अधिक सुलभ व करदात्यांना दिलासादायक झाली आहे,” असे मत ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सचे (एआयएफटीए) राष्ट्रीय अध्यक्ष पंकज घिया यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या 43 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंकज घिया बोलत होते. राज्यस्तरीय जीएसटी परिषद, विविध पुरस्कारांचे वितरण व अर्थक्रांतीचे संस्थापक अनिल बोकील यांचे अर्थकारणावरील व्याख्यान, सांस्कृतिक कलागुणांचे सादरीकरण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी सत्यनारायण पूजा, तसेच दीपाली ठक्कर यांचे कैवल्य ज्ञान विज्ञान सत्र झाले. राज्यस्तरीय जीएसटी कर परिषदेत महाराष्ट्रातून अनेक संघटना सहभागी झाल्या. गोविंद पटवर्धन, नरेंद्र सोनावणे, श्रीपाद बेदरकर, सीए स्वप्नील मुनोत, सीए योगेश इंगळे, संतोष शर्मा यांनी यांनी मार्गदर्शन केले. परिषदेत अनेक संघटनांनी जीएसटी सुलभ करण्यासाठी मते मांडली. यातून आलेल्या सर्व सूचना व प्रस्ताव ‘एमटीपीए’ सरकारकडे पाठविणार आहे.

शिवाजी रस्त्यावरील महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या ज्ञानमंदिर सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी विशेष अतिथी म्हणून नाईकनवरे डेव्हलपर्सचे संचालक रणजित नाईकनवरे, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सीएमए श्रीपाद बेदरकर, माजी अध्यक्ष नरेंद्र सोनावणे, उपाध्यक्ष अमोल शहा, सचिव प्रसाद देशपांडे, खजिनदार ज्ञानेश्वर नरवडे, सहसचिव, अनुरुद्र चव्हाण, समन्वयक प्रणव सेठ, विनोद राहते, उमेश दांगट, अश्विनी जाधव, मिलिंद हेंद्रे, स्वाती धर्माधिकारी, प्रशांत वायचळ, सुभाष घोडके, सुकृत देव, नवनाथ नलावडे आदी उपस्थित होते.

‘एआयएफटीए’च्या नॉर्थ झोनचे चेअरमन ओमप्रकाश शुक्ल, सेल्स टॅक्स बार असोसिएशन नवी दिल्लीचे अध्यक्ष संजय शर्मा यांना ‘एमटीपीए बेस्ट फ्रेंड ऑफ द इयर अवॉर्ड-2023’ने सन्मानित करण्यात आले. ‘एमटीपीए स्टार ऑफ द इयर 2023’ पुरस्कार सीए प्रदीप कपाडिया (मुंबई), सीए उमेश शर्मा (छत्रपती संभाजीनगर), प्रदीप क्षत्रिय (नाशिक), सुदर्शन कदम (सांगली), महेश बाफना (धुळे) अभिजित बेर्डे (रत्नागिरी) यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

वरिष्ठ कारसल्लागार रश्मीकांत दवे, सीए रत्नकुमार राठी, विजयकुमार कांकलिया, सतीश सालपे, विनायक गोखले यांना ‘कोहिनुर ऑफ एमटीपीए अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.

Pune Crime : पती म्हणावा की हैवान; चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या गुप्तांगाला दिले हीटरचे चटके

रणजित नाईकनवरे म्हणाले, “बांधकाम क्षेत्राला रेरा, जीएसटीसह अन्य कायद्याच्या व नियमांच्या पूर्ततेचा सामना करावा लागतो. यासंदर्भात कर सल्लागार आणि बांधकाम व्यावसायिक यांनी एकत्रित प्रयत्न केले, तर त्याचा लाभ होईल. येत्या काळात ‘क्रेडाई’ आणि ‘एमटीपीए’ यांच्या संयुक्तपणे प्रयत्नातून याबाबत मार्गदर्शन सत्रे घ्यायला हवी. करप्रणाली फेसलेस, ऑनलाईन व्हायला हवी. परवानग्या तात्काळ मिळाल्या, तर ग्राहकांना घरे देण्यात विलंब होण्याचे प्रमाण कमी होईल.”

सन्मानित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. तसेच एमटीपीए’च्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. श्रीपाद बेदरकर यांनी स्वागत प्रास्ताविकात ‘एमटीपीए’च्या 43 वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रणव शेठ व रुचिरा पवार यांनी सूत्रसंचालन केले. अमोल शहा यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.