Lonavala : ओला उबेरच्या विरोधात लोणावळ्यात टॅक्सी चालक मालकांचे लाक्षणिक उपोषण 

एमपीसी न्यूज – ओला उबेर टॅक्सी सेवा लोणावळ्यात बंद करा या मागणी करिता लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

लोणावळा हे पर्यटनाचे ठिकाण असून येथिल स्थानिक भूमिपुत्रांनी रोजीरोटी करिता टॅक्सी व रिक्षाचा व्यवसाय सुरु केला आहे. मात्र, ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांच्या वतीने ऑनलाईन बुकिंग घेत नागरिकांना कमी दरात प्रवासाची सुविधा पुरवली जात असल्याने स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली. सदरची टॅक्सी सेवा लोणावळा शहरातून बंद करावी, या मागणी करिता आजचे उपोषण करण्यात आले.

यामध्ये टॅक्सी चालक मालक संघटना पदाधिकार्‍यांसह प्रभारी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी, ज्येष्ठ नेते दत्तात्रय गवळी, महाराष्ट्र वाहतूक सेना अध्यक्ष उदय दळवी, परिवहन महामंडळाचे अध्यक्ष सुरेश भोर, युवानेते यशराज नेरकर, नगरसेवक निखिल कविश्वर, राजु बच्चे, दिलीप दामोदरे, सुधिर शिर्के, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजु बोराटी, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश केदारी, शिवसेना उपतालुका प्रमुख गबळू ठोंबरे, समन्वयक बाळासाहेब फाटक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख सुनिल इंगूळकर, नगरसेविका पुजा गायकवाड, संध्या खंडेलवाल, सुर्वणा अकोलकर, स्वाभिमान संघटना अध्यक्ष शौकत शेख, शिवसेना महिला आघाडी समन्वयक अमृता पाठारे, अमोल केदारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देत उपोषणला पाठिंबा दर्शविला.

चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष महेश केदारी, हेमंत मेणे, मंगेश कदम, निखिल कविश्वर, अमोल शेडगे, नरेंद्र निकाळजे, गणेश कदम यांच्यासह चालक मालक मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.