TB Free India Mission : क्षयरोग नष्ट करण्यासाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा – डॉ.लक्ष्मण गोफणे

एमपीसी न्यूज : क्षयरोग (टीबी) मुक्त भारताची संकल्पना समोर ठेवून प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियान राबविण्यात येणार येत आहे. (TB Free India Mission) यासाठी राष्ट्रपती यांच्या हस्ते 9 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियान या महत्त्वकांक्षी योजनेचा  शुभारंभ करण्यात आला असून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन महापालिका वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले.

क्षयरोग रुग्णांना आहार देण्याचा कार्यक्रम शनिवारी आकुर्डी येथील क्षयरोग नियंत्रण केंद्रात पार पडला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, क्षयरोग अधिकारी डॉ.अंजली ढोणे, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, शीतल शिंदे, तुषार कामठे, सुलक्षणा शिलवंत, उद्योजक विनोद आडसकर, सामाजिक कार्यकर्ते इखलास सय्यद आदी उपस्थित होते.

Today’s Horoscope 25 September 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

क्षयरुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांना पूरक आहाराची गरज असते. अनेकवेळा परिस्थिती नसल्याने अनेक लोक आहार घेत नाहीत. (TB Free India Mission) शासनाकडून दिली जाणारी मदत अपुरी ठरते. यासाठी निक्षय मित्र क्षयरोग रुग्ण दत्तक मोहिमेअंतर्गत  शहरातील क्षयरोग असलेल्या रुग्णांना पौष्टीक आहार देण्यासाठी राज्य शासनाने आवाहन केले आहे. या अंतर्गत शहरातील लोकप्रतिनिधींनी रुग्ण दत्तक घेतले असून वर्षभर या रुग्णांना दर महिन्याला पौष्टीक आहार देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व दानशूर व्यक्ती, औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था यांना निक्षय मित्र होऊन क्षयरुग्णांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.