BNR-HDR-TOP-Mobile

Pune : निवृत्त सेवकांसाठी चहापानाचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज – निवृत्त सेवक दिनानिमित्त पुण्यातील शासकीय, अर्धशासकीय व महानगरपालिकेतील निवृत्त सेवकांसाठी चहापानाचा कार्यक्रम महापालिका सभागृहात संपन्न झाला. निवृत्त सेवा संघ कार्यालयाचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले.

कै. द. दा. ओरपे हे अनेक वर्षे पुणे महापालिकेत चीफ ऑडिटर या पदावर काम करून सेवानिवृत्त झाले होते. पुुणे महापालिकेत कामास असणाऱ्या सेवानिवृत्त झालेल्या ओरपे यांच्या स्मरणार्थ द. दा. ओरपे स्मृती पुरस्कार देण्यात येतो. ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हमेंट या शासकीय व स्वायत्त संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या एल. एस. जी. डी व एल. जी. एस या शासकीय परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या व महापालिकेत सेवेत असणाऱ्या सेवकांना हा पुरस्कार दिला जातो.

या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, प्रशस्तिपत्रक, पुष्पगुच्छ, श्रीफळ असे होते. यंदाचे वर्षी एल. एस. व जी. डी. या विभागात प्रथम – पुरुषोत्तम चाटे, व्दितीय क्रमांक अश्विनी कवठेकर व एल. जी. एस विभागात प्रथम क्रमांक – विजय इंगळे, व्दितीय क्रमांक गोविंद राठी या गणवंत सेवकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे महापालिका निवृत्त सेवक संघाचा या कार्यक्रमात हिरीरीने सहभाग असतो. याप्रसंगी महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष एन. डी. मारणे यांच्या हस्ते एल.एस.जी.डी व एल.जी.एस या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत सेवकांना कै. द.दा.ओरपे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like