Talegaon : करंजगाव ग्रामपंचायतीमार्फत विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव समारंभ 

एमपीसी न्यूज – करंजगाव ग्रामपंचायतीमार्फत गोल्डन गलेड्स माध्यमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विद्यार्थी-शिक्षक गुणगौरव समारंभ संपन्न झाला. एस.एस.सी.बोर्ड 2019 च्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाच्या अभिषेक चंद्रकांत गायकवाड, अनुजा दिलीप वाटाणे, ऋतुजा बापू पोटफोडे या विद्यार्थ्यांना सन्मानित केले.

संत तुकाराम साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव टाकवे, करंजगावच्या विद्यमान सरपंच उर्मिला रवींद्र शेलार, माजी सरपंच तानाजी पोटफोडे, ग्रामसेविका आर.सी.राऊत, केंद्र प्रमुख युनूस मुलाणी, मुख्याध्यापक बापूराव नवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शिक्षक दिनेश टाकवे यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे रोशन तुकाराम कारके, प्रजत भाऊसाहेब जाधव, प्रियांका दत्ता गायकवाड या विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले. सूत्रसंचालन दिनकर सातकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.