Pune News : पवना धरणात बुडून एका शिक्षकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पवना धरणात बुडून मुंबईतील (Pune News) 62 वर्षीय शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी घडली. प्रेमप्रकाश रोशनलाल भाटिया असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. 

भाटिया शिक्षक होते. पवना धरण परिसरातील दुधिवरे गाव परिसरात भाटिया कुटुंबीय रविवारी (8 जानेवारी) पर्यटनासाठी आले होते. सकाळी अकराच्या सुमारास प्रेमप्रकाश भाटिया पवना धरणातील पाणलोट क्षेत्रात पाेहण्यासाठी उतरले. पोहताना भाटिया यांची दमछाक झाल्याने ते बुडाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील हवालदार विजय गाले यांनी स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यास सुरुवात केली.

Pimpri news: देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी -डॉ. रवी गोडसे (अमेरिका)

शिवदुर्ग संस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बेशुद्धावस्थेतील भाटिया यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.(Pune News) या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय गाले तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.