Pimpri: कोरोनाच्या जलद टीममधील शिक्षकांची दांडी; प्रत्येकी पाचशे रुपये दंड

Teachers absent in Corona's quick team; A fine of five hundred rupees each कोरोनाचे कामकाज राष्ट्रीय आपत्तीत मोडत आहे. त्यामुळे नेमणुका केलेल्या कर्मचा-यांनी कोणतेही कारण न सांगता प्रामाणिकपणे कामकाज करणे अपेक्षित होते.

एमपीसी न्यूज- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या जलद प्रतिसाद पथकातीत दांडी मारणा-या दोन शिक्षकांवर आयुक्तांनी कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दोघांवर प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची कारवाई केली आहे.

महादु किसन भवारी आणि सुदाम कुंडलिक केंगले अशी दंडात्मक कारवाई केलेल्या उपशिक्षकांची नावे आहेत. महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, त्याला अटकाव करण्यासाठी जलद प्रतिसाद टीमची स्थापना केली आहे.

त्यामध्ये महापालिका शिक्षण विभागातील शिक्षकांच्याही नेमणुका केल्या आहेत. कोरोनाचे कामकाज राष्ट्रीय आपत्तीत मोडत आहे. त्यामुळे नेमणुका केलेल्या कर्मचा-यांनी कोणतेही कारण न सांगता प्रामाणिकपणे कामकाज करणे अपेक्षित होते.

या महत्वपूर्ण कामकाजात भवारी आणि केंगले हे दोन शिक्षक गैरहजर राहिले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली असता दोघांनी खुलासा देखील केला नाही.

ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. त्यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजामध्ये गैरहजर राहून हेतुपुरस्सर अडथळा निर्माण केला.

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दोनही शिक्षकांवर प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची कारवाई केली आहे. त्यांच्या नजीकच्या वेतनातून दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे.

तसेच भविष्यात राष्ट्रीय कामकाजात गैरहजर राहणे, टाळाटाळ केल्यास जबर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यांच्या सेवापुस्तकात या आदेशाची नोंद केली जाणार आहे. दरम्यान, यापूर्वी देखील कोरोनाच्या जलद टीममधील दांडी मारणा-या दोन शिक्षकांवर कारवाई करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like