Chinchwad : श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालयात शिक्षकवर्गासाठी व्याख्यान

एमपीसी न्यूज – आज श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालय चिंचवड येथे पुणे जिल्हयातील शिक्षकवर्गाकरीता “आधुनिक शैक्षणिक विज्ञानातील महत्व (Digital India)” या विषयांवर व्याख्यान आयोजित केले होते. नाविन्याचा शोध घेणारा शैक्षणिक शास्त्रज्ञ संदीप गुंड यांचे मार्गदर्शन सर्व शिक्षकांना लाभले.

शाळेतील शैक्षणिक सुविधा, आधुनिक विविध प्रकारचे मॉडेल प्रयोगशाळा, शैक्षणित गुणवत्ता, शाळेतील विद्यार्थ्यांची खेळातील राष्ट्रीय स्तरावर अलौकिक कामगिरी या सर्वाची पाहणी करून संदीप गुंड यांनी संस्थेची महाराष्ट्रातील एकमेव आदर्श मॉडेल शाळा असे उदगार काढून भरपूर स्तुती केली. विद्यालयाच्यावतीने अमित बच्छाव यांनी संदीप गुंड यांचा सत्कार सन्मान केला.

या कार्यक्रमांस प्रमुख संदीप गुंड, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, विद्यालयाचे संस्थापक-अध्यक्ष अण्णासाहेब जाधव, विद्यालयाचे संचालक विजय जाधव, सचिव जगदीश जाधव, संचालक अमित बच्छाव, मुख्याध्यापक बाळाराम पाटील आदी उपस्थित होते. विजय जाधव यांनी नाना शिवले यांचा सत्कार केला. बाळाराम पाटील यांनी आभार सादर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.