Pimple Saudagar : विविध शाळांमध्ये शिक्षकदिन उत्साहात 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमध्ये विविध शाळांमध्ये शिक्षकदिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालीत न्यू सिटी प्राईट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षकदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यकमात संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते स्वरस्वतीपूजन व डॉ.सर्वपल्लीराधाकृष्ण यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, भगवान गोडांबे (सामाजिक कार्यकर्ते), मंजुळा मुदलीयार, मुख्याध्यापिका श्राबनी पत्रानाबिश, आणि शाळेतील शिक्षिका उपस्थित होत्या.

यानिमित्त शाळेतील शिक्षिकांचे पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांकृतिक कार्यक्रम, शिक्षिकासाठी संगीत खुर्ची खेळाचे आयोजन करण्यात आले. मनश्री निकाळजे या आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीला जिल्हा क्रीडा परिषद व पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्य स्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. भगवान गोडांबे यांनी विद्यार्थांना डॉ. सर्वपल्लीराधाकृष्ण यांच्या कार्या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक काटे याने केले आणि आभार पूजा चौधरी  हिने मानले. भाऊसाहेब तापकीर विद्यालयात शिक्षकदिन मोठ्या उत्साहाने साजरा  करण्यात आला.

व्ही एच बी पी पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका केली . तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार केले. शिक्षकांसाठी विविध कार्यक्रम केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची महती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिष्क अगरवाल व अपेक्षा भोसले या विद्यार्थ्यांनी केले.

शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी‍ आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
यावेळी संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करुन शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. त्यांचा गौरव करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर , मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी  आदी  वर्ग उपस्थित होता. विद्यानंद भवन मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा निगडी येथील सच्चिदानंद एज्युकेशन ट्रस्ट संचलित विद्यानंद भवन हायस्कूलमधील आज  तब्बल 90 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सच्चिदानंद ट्रस्टचे अध्यक्ष भरत चव्हाण पाटील,विश्वस्त सुप्रिया चव्हाण पाटील,विश्वस्त  श्वेता भरत चव्हाण पाटील यांचे हस्ते दीप प्रज्वलित करून झाली. मेहनतीने शिकवणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे कौतुक सौ श्वेता चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राथमिक विभागाच्या विद्यार्थीनींनी पारंपरिक नृत्य करून रसिकांच्या टाळ्यांची दाद मिळवली. मोठ्या विद्यार्थ्यांनी नृत्य व नाटकाच्या माध्यमातून आपल्या गुरुजनांना शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे पालक संघाने ही शिक्षक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मान केला. पालक संघाने विविध मनोरंजनाचे खेळ सादर करून शिक्षकांचे छान मनोरंजन केले.साहेबराव जाधव यांनी विनोदी एकपात्री नाटिका सादर करून सर्वाना मनमुराद हसवले. संस्था अध्यक्ष  भरत चव्हाण पाटील यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. शिक्षकांचे कौतुक केले. मनोहर सभागृह निगडी येथे झालेल्या या सोहळ्याचे आयोजन मुख्यध्यपिका छाया हब्बू, सविता किरंगे, प्रीती शिंदे, शीतल म्हात्रे, क्षिप्रा रेगे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार जया श्रीनिवासन यांनी मानले.

तळेगाव येथील  मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात आला.  तळेगाव शिक्षण परिषदेचे अध्यक्ष  संपत गावडे  यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी शाळेचे अध्यक्ष  गणेश खांडगे, उपाध्यक्ष  अविनाश पाटील आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी संगीतमय नाटकातून शिक्षकांच्या भूमिकेचे सादरीकरण केले. शालेय शिक्षणाचा भावी आयुष्यात कशा प्रकारे वापर करावा हा संदेश या नाट्यछटेतून दिला. शिक्षक हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचे काम करतात.

विद्यार्थ्याच्या जडण`घडणीत शिक्षकांचा वाटा मोलाचा असतो म्हणूनच विद्यार्थ्यांनी शिक्षकांना आदरयुक्त मुकुट देऊन  सन्मानित केले. आर्या ठाकूर, साक्षी आसबे, तब्सुम अत्तर यांनी प्रार्थना सादर केली.
ज्ञानदानाच्या कार्याबरोबरच शाळेतील इतर कार्यामध्ये विशेष योगदान देण्याऱ्या यशश्री आलम, शीतल जाधव , युनूस पटेल, रिया कुमारी, सूशील खंडागळे , संजीवनी गुडीगाड, दीपमाला दोबरे, रेखा नंदगवळी, वीणा विश्वकर्मा,  पल्लवी जाधव, स्नेहल सातकर, दीक्षा त्रिपाठी, नम्रता परदेशी यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

संपत गावडे यांनी शिक्षकांचे समाजातील स्थान व महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच  गणेश खांडगे यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका  प्रणाली गुरव यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले.  कार्यंक्रमाचे संयोजन समृध्दी मिश्रा, सांजली भोसले, विशाखा यादव यांनी केले तर सूत्रसंचालन धनुष व प्रांजल लांडगे यांनी  केले. रोटरॅक्ट क्लब ऑफ तळेगांव दाभाडे सिटीच्या वतीने येथील ऍड.पु.वा.परांजपे विध्यालयात शिक्षण दीना निमित्त शिक्षक गौरव समारंभ पार पडला.

यावेळी परांजपे विद्यालयातील शिक्षकांचा रोटरॅक्ट क्लब ऑफ तळेगांव दाभाडे सिटीचे अध्यक्ष रोटरॅक्टर केशव मोहोळ व सहकाऱ्यांच्या शुभहस्ते आदर्श शिक्षक म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये अध्यापक धनंजय नांगरे सर, संजय वंजारे सर, तसेच अध्यापिका स्मिता हिरवे मॅडम, छाया खोमने मॅडम, कांचन देशमुख मॅडम, अनिता नागपुरे मॅडम यांचा व रोटरी सिटीचे सभासद आणि विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापक रोटेरियन भगवान शिंदे सर यांचा समावेश होता. तसेच रोटरी सिटीचे क्लब ट्रेनर रोटेरियन दिलीप पारेख व रोटरॅक्ट क्लब ट्रेनर रो. दीपकजी फल्ले यांना आदर्श मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना अध्यक्ष केशव मोहोळ यांनी प्रत्येक विध्यार्थी वा व्यक्तीच्या जीवनातील शिक्षकांचे महत्व पटवून देऊन भारताचे माजी राष्ट्रपती व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातील प्रमुख तीन प्रश्नांवर माहिती दिली तसेच कवी कुसुमाग्रज यांची कणा ही कविता सादर करण्यात आली.

त्याप्रमाणे रोटेरिएन दिपक फल्ले यांनी आपल्या मनोगतातून, “यशाच्या दिशेने माग्रक्रमन करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एकमेव शिक्षकच मार्गदर्शक आहेत, प्रत्येक विद्यार्थी वा व्यक्तीच्या पाठीमागे शिक्षकांसारखा दुसरा गुरु होणे नाही. हे उदाहरणासह पटवून दिले. यावेळी अध्यक्ष रोटरॅक्टर केशव मोहोळ-पाटील, उपाध्यक्ष यशवंत दाभाडे, सचिव प्रतिक माने, परांजपे विद्यालयाचे मुख्याध्यापक राधाकृष्ण येणारे सर, प्रकल्प प्रमुख अवधूत साळुंखे, सहप्रकल्प प्रमुख संकेत करणकोट, रोटरॅक्टर आकाश लांडे, कौस्थुभ उपाध्ये, अथर्व कदम, हर्षद जव्हेरी, धनश्री पाळसकर, वैभव रिकामे, शुभम शेळके आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.