Pimpri : इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचा शिक्षक दिन उत्साहात

एमपीसी न्यूज – इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे मावळ तालुक्यातील साते गावातील नानासाहेब बलकवडे विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. क्लबच्या सदस्यांनी तसेच शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा अॅड. प्रतिभा जोशी दलाल, रेखा मित्रगोत्री, कमलजीत दुल्लत, अर्जुन दलाल, शाळेतील शिक्षक आदी उपस्थित होते. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करत त्यांना स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे पोस्टर भेट म्हणून देण्यात आले.

अॅड. प्रतिभा जोशी दलाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतभर 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. जगातील 40 पेक्षा अधिक देशांमध्ये शिक्षक दिवस साजरा केला जातो. शिक्षकांना सन्मान बहाल करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिवस साजरा केला जातो. यामुळे आदर्श शिक्षक निर्माण होण्याची प्रेरणा मिळते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.