Pune : संस्कार व त्यागाशिवाय जीवन घडत नाही: एल.एम.पवार

एमपीसी न्यूज – जीवनाच्या कोऱ्या पाटीवर रेगोट्या ओढण्याचे काम आई, वडील व शिक्षक करीत असतात.विद्यार्थ्यानी कल्याणकारी मित्र बाळगावेत. जीवनामध्ये जो कृतज्ञ असतो त्याला कोणीही विसरत नाही.संस्कार आणि त्यागाशिवाय जीवन घडत नाही असे मत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव मा.एल.एम.पवार यांनी मांडले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा वर्धापन दिन व शिक्षक दिन निमित्त महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी बोलत होते.यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व मा.जिल्हा परिषद सदस्य शिवनाना कोंडे, पुरुषोत्तम सदाफुले, आर.जे.रांजणे, बाजीराव सातपुते, प्राचार्य डॉ.आर.व्ही.ढेरे, श्री.अवताडे उपस्थित होते.पुढे ते म्हणाले कि, संस्थेच्या आज संपूर्ण पुणे जिल्हयात शाखा असून एक लाखांच्या पुढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.संस्थेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत.

आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही .ढेरे यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या इतिहासाचा आढावा घेतला.संस्थेचे संस्थापक स्व.बाबुरावजी घोलप साहेब, आण्णासाहेब आवटे, मामासाहेब मोहोळ, शंकरराव भेलके साहेब, प्रा.रामकृष मोरे साहेब यांनी संस्था स्थापनेत व ग्रामीण भागात शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार विद्यार्थ्यांसमोर मांडला तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब हे भौतिक सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांच्या कालखंडात शिक्षणाचा दर्जा वाढविला असे मत व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी आपल्या मनोगतात मित्राला व्याख्येत बांधता येत नाही, पुस्तकांशी मैत्री करा, विद्यार्थ्यानी तुकारामांची गाथा, भग्वद्गीता, ज्ञानेश्वरी वाचावी. केवळ अक्षरांची ओळख म्हणजे शिक्षण नव्हे.त्यांनी समाज जीवनावर आधारित कविता सादर केली.पुणे जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष आर.के.रांजणे यांनी आपल्या मनोगतात विध्यार्थ्यानी पाश्चत्त देशांचा पगडा सोडला पाहिजे.सर्व साध्य सफल होण्यासाठी शिक्षण घ्यावे.देशासाठी, समाजासाठी, दिन -दुबळ्यांची सेवा करावी.ज्ञानाचा सदुउपयोग करण्याचे अवलोकन करावे असे मत व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे उपाध्यक्ष बाजीराव सातपुते यांनी त्याग केल्याशिवाय यशप्राप्ती होत नाही.जिद्द, चिकाटी व लक्ष ठेवल्यास यशस्वी होता येते.माराही भाषेशिवाय इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे.त्यांनी साने गुरुजी यांचे शैक्षणिक जीवन, शिक्षक व कार्य यांचा आढावा घेतला.येशवंतराव चव्हाण, ए.पी.जे.अब्दुल कलाम, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याचे वर्णन केले.त्यांनी आई महात्म्यावर आधारित कविता सादर केली तसेच त्यांनी लिहिलेल्या “थोरांच्या पाऊलखुणा” या पुस्तकाच्या पाच प्रति महावियालयातील ग्रंथालयास भेट दिल्या.

सदर कार्यक्रमाचे संयोजन प्रा.कारले पी.बी., डॉ.साची घाडगे, प्रा.जीवन गायकवाड, प्रा.भगवान गावित, प्रा.टी.बी.घोरपडे, डॉ.आर.जी.सरोदे, डॉ.साधना भंडारी, प्रा.वर्षा दसवडकर, प्रा.अमोल पावगे, प्रा.प्रल्हाद ननावरे, प्रा.रोशनी पवार, प्रा.मंजुषा धुमाळ, श्री.महेश दळवी, श्री.रुपेश मोहिते यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर व्ही.ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचा सन्मान विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.तसेच विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या व शिक्षक दिनानिमित्त एक दिवस महाविद्यालयात शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप लांडगे यांनी केले तर आभार डॉ.विशाल पावसे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.