Bhosari :  भोसरीत 11 ऑक्टोबरला एक दिवसीय शिक्षकांचे काम बंद आंदोलन

एमपीसी न्यूज  –  लोककल्याण मजदूर युनियनच्या वतीने शिक्षक-शिक्षकेत्तर एक दिवसाचे लाक्षणिक काम बंद आंदोलन दि. ११ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे.  विविध मागण्याचे संगमेश्वर एज्युकेशन ट्रस्ट, सिद्धेश्वर हायस्कूलचे प्राचार्य यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले आहे. 

शासन नियमाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांकडून नियमितपणे फी आणि शुल्क वसूल करीत आहात पण सदर रकमा योग्य आणि कायदेशीर बाबीसाठी खर्च न करता स्वतःकडेच ठेवून  घेत आहात. सर्व कर्मचा-यांना नेमणूक पत्र देणे आवश्यक आहे. दोन वर्षाच्या सेवेनंतर प्रत्येक कर्मचा-यास कायम करणे- कायम कल्याचे आदेश देणे सदर आदेशात शासनाच्या शिक्षण विभागाचे मंजुरी घेणे, कर्मचा-यांना भविष्य निर्वाह निधी योजनेचा फायदा आणि लाभ घेणे, कर्मचा-यांच्या विविध दफ्तरी नोंदी करणे, नियमितपणे आणि दरसाल कायद्यानुसार वार्षिक वेतन वाढ देणे आदी बाबी करण्याचे बंधन तुमच्यावर होते आणि आहे, पण यापैकी कशाचीही पूर्तता केली नाही.
शिक्षक शिक्षकत्तेर कर्मचारी नोंदणीकृत संघटनेचे सभासद असून सध्या ही एकमेव कामगार संघटना त्याचे प्रतिनिधित्व करीत आहे संबंधित सर्व शासकीय व निमशासकीय संस्थाना देखील कळविले आहे, आदी मागण्यांसाठी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. दिलेल्या निवेदनांवर लोककल्याण मजूर युनियनचे अध्यक्ष अॅड. आर. बी. शरमाळे, एस. डी. फुगे, अरुण काळे आदींच्या स्वाक्ष-या आहेत .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.