Team India : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

एमपीसी न्यूज – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साठी भारताचा सामना न्यूझीलंड सोबत होईल तर, इंग्लंड सोबत पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी 20 खेळाडूंची निवड करण्यात आली असून विराट कोहलीकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

भारताच्या कर्णधारपदी विराट कोहली आणि उपकर्णधारपदी अजिंक्य रहाणे आहे. भारताच्या सलामीसाठी रोहित शर्मा, शुभमन गिल आणि मयांक अगरवाल यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारताच्या मधल्या फळीसाठी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, लोकेश राहुल यांचे स्थान कायम राहीले आहे. लोकेश राहुल जर पूर्णपणे फिट असेल तरच त्याला संधी देण्यात येणार आहे. तो जर फिट नसेल तर त्याच्या जागी अन्य एका खेळाडूची निवड करण्यात येऊ शकते.

_MPC_DIR_MPU_II

आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक 72.2 गुण पटकावत भारताने प्रथम स्थान प्राप्त केले आहे. तर 700 गुणांसह न्युझीलँड दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि न्युझीलँडमध्ये या चॅम्पियनशीपचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साउथहॅप्टन मधील मैदानावर खेळवला जाणार आहे.

भारत-इंग्लंड कसोटी वेळापत्रक

– पहिला सामना 4 ते 8 ऑगस्ट, नॉटिंगहॅम
– दुसरा सामना 12 ते 16 ऑगस्ट, लॉर्ड्स
-तिसरा सामना 25 ते 29 ऑगस्ट
– चौथा सामना 2 ते 6 सप्टेंबर
– पाचवा सामना 10 ते 14 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.