T20 WC : T20 वर्ल्डकप साठी टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय T20 वर्ल्डकप काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या वर्ल्डकप साठी भारताने आपल्या नवीन जर्सीचे अनावरण केले. बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. टिम इंडियाच्या नवीन जर्सीचा रंग गडद निळा आहे.

विराट कोहली, रोहित शर्मा, के.एल राहुल, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा जर्सीसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करत बीसीसीआयने लिहिले, ‘जर्सीचा नमुना चाहत्यांच्या कोट्यवधी प्रोत्साहनाने प्रेरित आहे.’ भारताने आयोजित केलेला हा T20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये खेळला जाईल.

 

टिम इंडिया T20 वर्ल्डकपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात 24 ऑक्टोबर रोजी दुबईत पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्याने करणार आहे. यानंतर, भारताचा सामना 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी होईल. त्याच वेळी, 3 नोव्हेंबर रोजी, अबुधाबीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध त्याचा तिसरा सामना असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.