Technical News : भारताचे ‘हाईक स्टीकर चॅट ॲप’ होणार या महिन्यात बंद!

एमपीसी न्यूज : हाईक स्टीकर चॅट हे ॲप महिनाअखेरपर्यंत बंद होणार असल्याचे कंपनीचे सीईओ केविन भारती मित्तल यांनी ट्विट करुन जाहीर केले आहे. सहा जानेवारीपासून ॲप वापरकर्त्यांना त्यांचे संदेश एक्पोर्ट करण्याचे आणि सगळा डाटा डाऊनलोड करण्याचा पर्याय दिल्याचे नोटिफीकेशन येत आहे. हे ॲप 14 जानेवारीपर्यंत रात्री 11.59 पर्यंत चालणार असल्याचे मित्तल यानी सांगितले आहे.

हाईक स्टिकर चॅट ॲपवर लोकं दरदिवशी 35 मिनिटं घालवत असल्याचे आणि प्रत्येक महिन्यात 30 हजार नवीन व्यक्ती जॉईन होत असल्याचे मित्तल यांनी सांगितले. हे ॲप 2019 साली अस्तित्वात आले असून यांत 40 भारतीय भाषांमधील स्टिकर्स आहेत. याबरोबरच मित्तल यांनी त्यांच्या ‘वाईब बाय हाईक’ व ‘रश बाय हाइक’या दोन नवीन ॲप्सची घोषणा केली आहे. पूर्वीचे ‘हाईकलॅंड’ हेच वाईब बाय हाईक या नव्या अवतारात असणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

वाईब ॲपसाठी अर्ज करावा लागणार आहे. ज्यांनी अर्ज केला आहे, त्यांनाच हे ॲप डाऊनलोड करता येणार आहे. https://vibe.fun/welcome येथून हा अर्ज करता येणार आहे. ‘रश’ ॲप मात्र पूर्णत: नवीन असे गेमिंग ॲप असणार आहे. रश हे ॲपल स्टोअरवर उपलब्ध आहे.

भारताकडे स्वदेशी असे संदेशांची देवघेव करणारे ॲप नसणार आहे. जागतिक बाजारपेठेचा आपल्यावर होणारा परीणाम हा खूप प्रखर आहे. भारताने पाश्चिमात्य कंपन्यांना बॅन केले तरच भारतात स्वदेशी बनावटीचे ॲप त्याचा प्रभाव टाकू शकेल, असे ट्विट मित्तल यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.