Technology News : आता मिळणार ‘डिजीटल मतदार कार्ड’

एमपीसी न्यूज: देशात दरवर्षी 25 जानेवारीस मतदार दिन साजरा केला जातो. यावेळेस मतदारांना ई मतदार ओळखपत्र देण्यासाठी निवडणुक आयोग ‘ई-एपिक’ म्हणजेच ‘इलेक्ट्रॉनिक इलेक्टोरल फोटो आयडेंटी कार्ड’ हे ॲप लाँच करणार आहे.

या ॲपच्या सुविधेमुळे नागरिक त्यांचे ई मतदार ओळखपत्र मोबाईल, संगणकामध्ये डाऊनलोड करू शकणार आहे. पण या कार्डात नागरिक कोणत्याही प्रकारचे बदल करु शकणार नाही. या कार्डात फोटो, सिरीयल क्रमांक आणि सुरक्षित क्यूआर कोड अशा घटकांचा समावेश असणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

या ॲपमुळे नागरिकांकडे डिजिटल स्वरुपातही कार्ड राहणार आहे. ह्या कार्डाबरोबरच भौतिक कार्डही मतदारांकडे असणार आहे. हे ॲप दोन टप्प्यात लाँच होणार आहे. याचा पहिला टप्पा 25 जानेवारीपासून चालू होणार असून यांत नवमतदारांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. याचा दुसरा टप्पा 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून यांत सर्व मतदारांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान यादीमध्ये नाव समाविष्ट करताना मोबाईल क्रमांक देणे अनिवार्य असेल. मतदार यादीत मोबाईल क्रमांक आणि नाव असल्यास ओटीपी तुमच्या मोबाईल क्रमांकावर पाठवला जाईल व या ओटीपीच्या मदतीने मतदाता ‘e-Epic ॲप’ डाऊनलोड करु शकणार आहे.

या ॲपचा लाभ घेण्यासाठी मोबाईल क्रमांक व मेल आयडी मतदार यादीत जोडलेला असणे बंधनकारक आहे. भौतिक कार्ड हरवल्यास या डिजिटल मतदार ओळखपत्राचा फायदा नागरिकांना यामुळे होणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.