_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Technology News : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाने बनवली ई-बायसिकल

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने पर्यावरणपूरक ई-बायसिकलची निर्मिती केली आहे. पर्यावरणास धोका होऊ नये व इंधनाचा खर्च होऊ नये तसेच सायकल चालवणे कष्टमय होऊ नये, असे उद्देश पुढे ठेऊन मॅकेनिकल इलेक्ट्रॉनिक्सचे तंत्रज्ञान वापरून ही ई-बायसिकल बनवण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

ही बायसिकल ताशी बत्तीस किलोमीटर वेगाने चालवता येणार असून याचे अडीच तास चार्जिंग होऊ शकते. अत्यंत कमी खर्चात ही सायकल बनवली गेली आहे. यामागची मूळ संकल्पना राजेश सर्वज्ञ यांची असून प्राध्यापक सागर जोशी, राहुल पाटील यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना घेऊन याची निर्मिती केली आहे. येत्या काळात सुरक्षा, क्षमता अशा मुद्द्यांवर नवीन सुधारणा करून त्यांना यांत समाविष्ट करण्यात येणार आहे, असे प्रा. जोशी म्हणाले.

या उपक्रमाचे संस्थेचे मार्गदर्शक कृष्णराव भेगडे, अध्यक्ष बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्सस्के, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, महेश शहा, प्रा. ललितकुमार वधवा यांनी कौतुक केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.