Technology News: नेटफ्लिक्समध्ये लवकरच येणार ‘शफल प्ले’ फिचर

एमपीसी न्यूज – नेटफ्लिक्स हे ‘शफल प्ले’ या फिचरचे टेस्टिंग करत असून लवकरच ते सर्वांच्या वापरासाठी उपलब्ध होणार आहे. ऑगस्ट 2020 पासून नेटफ्लिक्स या फिचरची तपासणी करत आहे.

या फिचरमध्ये स्क्रिनवर ‘शफल प्ले’ असे एक बटण देण्यात येणार आहे. सध्या नेटफ्लिक्सवर शफल करण्याचा पर्याय नसून ‘ब्राऊज’ हा पर्याय आहे. ब्राऊजच्या माध्यमातून वापरकर्ता त्याला बघायचा सिनेमा, लघुपट, डॉक्यूमेंट्री, सिरीज इत्यादी शोधू शकतो. परंतु आता ‘शफल प्ले’ फिचर हे वापरकर्त्यासाठी नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या सगळ्या सिनेमा, सिरीज इत्यादींमधून ठराविक पर्याय समोर ठेऊ शकणार आहे.

ब-याच वेळेस नक्की काय बघायचे असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. अशावेळी ब्राऊजचा पर्याय असूनही त्यात नक्की काय शोधायचे हे देखील कळत नाही. अशावेळी हे ‘शफल प्ले’ फिचर कामाला येणार आहे. प्रेक्षकांनी ब्राऊजचा पर्याय स्किप केल्यास नेटफ्लिक्स त्यांच्या मनोरंजनासाठी स्वत: काही पर्याय पुढे ठेऊन ते प्ले करेल.

हे पर्याय प्रेक्षकांनी निवडलेल्या पसंतीच्या प्रकारांतीलच असतील. ह्या फिचरचे वर्णन हे Not sure what to watch? Try shuffle play असे असणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.