Technology News : व्हॉट्स ॲप वेब आणि डेस्कटॉप व्हर्जनमध्ये येणार ‘ही’ सुरक्षा वैशिष्ट्ये
एमपीसी न्यूज : व्हॉटस ॲप लवकरच डेस्क्टॉप आणि वेब व्हर्जन वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी नवीन सुरक्षा फिचर लाँच करणार आहे. यांमध्ये वापरकर्ता आता व्हॉट्स ॲप वेब किंवा डेस्क्टॉप ॲप वापरण्यासाठी फिंगरप्रिंट लॉक किंवा फेस आयडी लॉकचा वापर करू शकणार आहे.
सध्या वेब व्हॉट्स ॲप वापरण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो. व्हॉट्स ॲप आता डेस्कटॉपला किंवा वेब व्हर्जनला लिंक करण्यापूर्वी पहिले व्हेरिफाय करावे लागणार आहे. या फिचरमुळे ॲड्रॉईड वापरकर्ते वेब व्हॉट्स ॲप आता फिंगरफ्रिंटच्या माध्यमातून लॉक करू शकणार आहेत व आयफोन वापरकर्ते हे फेस आयडी वापरून स्वत:चे अकाऊंट व्हेरिफाय करू शकणार आहेत. फिंगरप्रिंटच्या माध्यमातून व्हॉट्स ॲपला लॉक करायचे हे वैशिष्ट्यं मोबाईल ॲपमध्ये मात्र आधीपासूनच उपलब्ध आहे.
Today we’re starting to roll out a new security feature for WhatsApp Web and Desktop: face and fingerprint unlock when linking devices.
WhatsApp does not see your face or fingerprint data.
Chats for your 👀 onlyhttps://t.co/qR3zsexzfj pic.twitter.com/Ei5G35MPpA
— WhatsApp (@WhatsApp) January 28, 2021
असे असले तरी व्हॉट्स ॲप कंपनीकडून कोणतीही बायोमेट्रिक माहिती संकलित करण्यात येणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. याचबरोबर व्हॉट्स ॲप वेबचा लूक आणि डिझाईनमध्येही काही बदल होणार आहेत.