Bihar Election “तेजस्वी यांनी सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला”,

राष्ट्रवादीकडून तेजस्वी यादव यांचे कौतुक सुरूच

एमपीसी न्यूज : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळवताना सत्ता कायम राखली आहे. आज पहाटेपर्यंत सुरू असलेल्या मतमोजणी प्रक्रियेनंतर बिहारमधील सर्वच्या सर्व म्हणजे 243 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये एनडीएने 125 जागा मिळवत वर्चस्व राखले आहे. परंतु असे असले तरी तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने 75 जागा मिळवत बिहार मधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांच्यावर चहूबाजूने कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांकडून तेजस्वी यादव यांचं कौतुक होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल पुण्यात बोलताना एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यासारखे अनुभवी नेते असताना दुसऱ्या बाजूला अनुभव नसलेला तरुण नेता निवडणूक लढवत होता. त्यामुळे तेजस्वी यादव यांना जेवढ्या जागा मिळाल्या की त्यांची अचिव्हमेंट म्हणावी लागेल असे बोलत तेजस्वी यादव यांचे कौतुक केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आज ट्विट करत तेजस्वी यादव यांचे कौतुक केले.

 आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “मेरे हार की चर्चा होगी जरूर, मैंने हार के बाजी जिती है”

बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. युवकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III