Temperature : पुणे परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी,शिवाजीनगर येथे 36.8 अंश सेल्सिअस तर चिंचवड येथे 39.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, तापमानात कमालीची घट

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला मागील तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस,विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह  पावसाने झोडपले असून पुढील तीन ते चार दिवस पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह  पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

पुणे जिल्ह्यात आणि पिंपरी-चिंचवड उपनगरात एप्रिल आणि मे महिन्याच्या पूर्वार्धात तापमानात प्रचंड वाढ(Temperature) झाली होती.त्यामुळे नागरिकांना  उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. परंतु,गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसामुळे पुणे जिल्हयातील बहुतांश भागात तापमानात कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. आज दि.(16 मे) रोजी पुणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमान बल्लाळवाडी(जुन्नर) येथे 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून सर्वात कमी लवासा येथे 35.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Chinchwad : होर्डिंगचे  स्ट्रक्चरल ऑडीट करा, आमदार जगताप, माजी विरोधी पक्षनेते काटे यांची मागणी

पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस विदर्भातील बुलढाणा, वाशिम आणि वर्धा वगळता उर्वरित जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.तसेच,कोकणातील बहुतांश जिल्ह्यांत हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता(Temperature) वर्तवण्यात आली आहे.

आज दि.(16 मे) रोजी पुणे जिल्हा व परिसरातील तापमानाची नोंद पुढीलप्रमाणे :-

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.