Talegaon Dabhade : मंदिर ही संस्काराची केंद्रे आणि प्रेरणास्थाने : ज्ञानचैतन्य महाराज

एमपीसी  न्यूज : – मंदिर ही संस्काराची केंद्रे आणि प्रेरणास्थाने असून परमेश्वराची उपासना करताना मनाची एकाग्रता हवी तशीच जीवनात मनःशांती महत्वाची आहे, असे प्रतिपादन आळंदी येथील शांकर विद्यापिठाचे प.पू. स्वामी १००८ ज्ञानचैतन्य महाराज यांनी तळेगाव दाभाडे येथे केले.

टकले कॉलनीमध्ये चौराई माता प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. टकले कॉलनीतील नभांगण सोसायटीच्या प्रांगणात जगदंबा चौराई माता मंदिराची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करीत चौराई माता प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा नुकताच संपन्न झाला.ज्ञानचैतन्य महाराज यांच्याहस्ते कलशारोहण करण्यात आले.

यावेळी आमदार सुनील शेळके, हभप शिवाजीमहाराज नवल, हभप ज्ञानेश्वरमहाराज दाभाडे, सोहळा प्रमुख  खंडू टकले, युवा उद्योजक  आदित्य टकले, काशीनाथ निंबळे, माजी नगरसेविका अमृता टकले – पंडित, गोपाळराव मराठे,जयवंत ठाकूर यांच्यासह भाविक  उपस्थित होते.

बाळासाहेब टकले आणि पार्वती टकले यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. खंडूजी टकले आणि कुसुम टकले यांच्या हस्ते वास्तुशांती सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार सुनील शेळके, शिवाजी महाराज नवल, ज्ञानेश्वर महाराज दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

दरम्यान,मूर्ती प्रदक्षिणा, वास्तुशांत, उदकशांत, होमहवन, मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा, ध्वजारोहण, कलश रोहण, महाआरती, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. ग्रामपुरोहित अतुल रेडे यांनी पौरोहित्य केले. आदित्य टकले यांनी प्रास्ताविक केले.अनिल धर्माधिकारी यांनी सुत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.