Pimpri : पादचारी तरुणाला टेम्पोची धडक; टेम्पोचालक फरार

135

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जाणा-या तरुणाला तीन चाकी टेम्पोने धडक दिली. यामध्ये तरुण जखमी झाला. दरम्यान टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना सोमवारी (दि. 10) रात्री आठच्या सुमारास पिंपरी येथे घडली.

HB_POST_INPOST_R_A

संतोष लमधर बिन्द (वय 26, रा. शिवतीर्थ नगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरीशंकर कुमावत असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि गौरीशंकर पिंपरी मधील ओम ट्रेडिंग कंपनी या दुकानासमोरून रस्त्याने पायी जात होते. अचानक तीन चाकी टेम्पोने गौरीशंकर यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. संतोष यांनी रस्त्याने जाणा-या रिक्षामधून गौरीशंकर यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान धडक देणारा तीन चाकी टेम्पो चालक टेम्पो घेऊन पळून गेला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: